

वॉशिंग्टन : जर एखाद्याला श्रीमंत व्हायचं असेल तर त्याला कठोर परिश्रम करावे लागतात आणि म्हणूनच लोक म्हणतात की पैसा हा कष्टाने कमवावा लागतो. पण एक महिला अशीही आहे जी फक्त दुपारी झोपून, टी.व्ही. बघून आणि लहान मुलांसोबत खेळून मोठी कमाई करते. आता तुम्ही विचार करत असाल की असं करून ती कसे बरं पैसे कमवत असेल? तर ही महिला 'केअर टेकर' म्हणून काम करते, ज्यात तिला श्रीमंत कुटुंबातील लहान मुलांची काळजी घ्यायची असते, याच गोष्टीसाठी तिला पगार दिला जातो.
कॅली नावाच्या या महिलेने एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत कॅली नावाची ही महिला तिला या नोकरीतून खूप समाधान मिळत असल्याचे सांगते. ती म्हणते, मी करत असलेली नोकरी ही जगातील सर्वोत्तम नोकर्यांपैकी एक आहे. ती सांगते की, दुपारी तिला मुलांसोबत बसून टी.व्ही. पाहावा लागतो. इतकंच नाही तर त्यांना सांभाळताना तिला मध्ये दुपारी तीन तास झोपही मिळते, त्यामुळे एकूणच हे काम सर्वोत्कृष्ट म्हणता येईल.
आपल्या दैनंदिन कामांची माहिती देताना कॅली म्हणते, श्रीमंत लोकांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. लोकांना तिच्या दैनंदिन जीवनाची अपडेट देताना कॅली म्हणते की तिचे काम सर्वात सोपे आहे. सर्वप्रथम ती मुलांसोबत बसून टी.व्ही. पाहते, त्यानंतर ती मुलांना सोडण्यासाठी शाळेत जाते. त्यानंतर सर्वात छोटा मुलगा हॅम्प्टन याच्यासोबत बसून ती स्टारबक्समध्ये कॉफी पिते. ती छोट्या हॅम्प्टनला स्टारबक्समधून केक देखील घेऊन देते. शाळेतून परतल्यावर दोघेही कॅलीच्या जीममध्ये जातात, तिथे कॅली जीम करते आणि हॅम्प्टन खेळतो.
जीम केल्यानंतर कॅली अंघोळ करून तयार होते. हे सर्व करून नंतर काही लोकांना भेटून दोघेही घरी परततात. शाळेतून आल्यावर कॅली हॅम्पटनसोबत जेवते आणि नंतर थोडा वेळ ते दोघे खेळतात. यानंतर कॅलीला जे काम करण्यात सर्वात जास्त आनंद मिळतो, ते काम ती करते आणि ते म्हणजे, कॅली आणि हॅम्प्टन घरी आल्यावर जेऊन तीन तास झोपतात. या वेळेत घरगुती कामं करणारे दुसरे गडी संपूर्ण घर स्वच्छ करतात आणि कपडे धुतात. अशाप्रकारे कॅलीचे काम संध्याकाळपर्यंत संपते. कॅलीने तिला या कामासाठी किती पैसे मिळतात हे सांगितलेलं नाही; पण अमेरिकेत श्रीमंत कुटुंबात केअर टेकर म्हणून काम करणार्या महिलांचा सरासरी पगार 30 लाख रुपये आहे. यावरून कॅलीला मिळणार्या पगाराचा अंदाज तुम्ही लाऊ शकता!