

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर मार्केटमध्ये आज ( दि. ३० मे ) आठवड्याचा दुसरा दिवसही सकारात्मक राहिला. बाजारातची सुरुवात सपाट झाली. मात्र, जागतिक सकारात्मक संकेतांनंतर अवघ्या तासाभरातच बाजाराने उसळी घेतली. निफ्टीने 50 अंकांची उसळी घेतली तर सेन्सेक्स देखील 100 अंकांनी वधारला. तर बँक निफ्टी 44,400 अंकांच्या जवळ पोहोचला. अखेर आज बाजारा बंद होताना सेन्सेक्स ६२९६९.१३ तर निफ्टी १८६३३.८५ वर स्थिरावला.
NSE निफ्टी 50 13.65 अंकांनी किंवा 0.07% घसरून 18,585 वर आला तर BSE सेन्सेक्स 46.96 अंकांनी किंवा 0.07% वाढून 62,893.34 वर पोहोचला. आजच्या व्यवहारात NSE निफ्टी 50 35.20 अंकांनी किंवा 0.19% वाढून 18,633.85 वर पोहोचला आणि BSE सेन्सेक्स 122.75 अंकांनी किंवा 0.20% ने वाढून 62,969.13 वर स्थिरावत बंद झाला.
आयटीसी, अपोलो हॉस्पिटल, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट आणि विप्रो कंपनीचे शेअर्स सर्वाधिक वाढले तर हिडाल्को, टाटा स्टील, टेक महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया आणि लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्संनी आज घसरण अनुभवली.