

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shardul Thakur : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील सहाव्या सामन्यात शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने तनजीद हसनला (13) बोल्ड केले. तर 28 धावांवर शार्दुलने (Shardul Thakur) इनामुल हकची (4) विकेट घेतली. त्यानंतर शकिब अल हसन आणि तौहीद हृदयॉय यांच्यात 5व्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी झाली. शार्दुलने ही भागीदारी 34व्या षटकात तोडली.
शार्दुलने (Shardul Thakur) 2022 पासून वनडेमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी तोडल्या आहे. हा पराक्रम त्याने आतापर्यंत 4 वेळा केला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोन्ही वेगवान गोलंदाजांना प्रत्येकी दोनदा 100 हून अधिक धावांची भागीदारी तोडण्यात यश आले आहे. तसेच कुलदीप यादव, आवेश खान आणि उमरान मलिक संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. तिन्ही गोलंदाजांनी वनडेमध्ये प्रत्येकी एकदा शतकी भागीदारी मोडली आहे.