file photo
Latest
Sharad Pawar : शरद पवार आयोगासमोर शुक्रवारी बाजू मांडणार
मुंबई : निवडणूक चिन्हाबाबत समन्स आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आपली बाजू मांडणार आहेत. यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्यासोबत असणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. पक्षाचे नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावरही त्यांनी अधिकार सांगितला आहे. दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या दावे-प्रतिदाव्यांवर म्हणणे ऐकून घेण्यासाठी निवडणूक आयोगाने शरद पवार यांना पाठविलेल्या समन्सनुसार ते दिल्लीला जाणार आहेत.

