

पुढारी ऑनलाईन : भाजपसोबत जाण्यास शरद पवार ५० टक्के तयार होते. याबाबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आमची वेळोवेळी सकारात्मक चर्चाही झाली होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शरद पवार कधीही भाजपमध्ये जाणार नव्हते. काही लोकांचा त्यांना भाजपमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. पण शरद पवारांनी त्याला नकार दिला. विचारसरणी स्वीकारहार्य नव्हती म्हणून ते गेले नाहीत." असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)
काही लोक शरद पवार भाजपमध्ये जाणार होते असे म्हणत आहेत, पण मला असे म्हणायचे आहे की, जर ते भाजपमध्ये जाणार होते तर मग ते का गेले नाहीत?, असा टोला त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव न घेता लगावला. पक्ष फुटला पण शरद पवारांची विचारसरणी बदलली नाही. काहीही झाले तरी विचारसरणी न बदलण्याची पवारांची भूमिका राहिली आहे. पवारांनी भूमिका न बदलल्याने आमचा पक्ष फोडला, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
बारामतीतून सुप्रिया सुळे १०० टक्के निवडून देतील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.
एका उद्योगपतींच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली बैठक हा त्यांना भाजपमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्नांचा एक भाग होता, असेही पटेल यांनी स्पष्टपणे सांगितले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पटेल बोलले ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे. यामुळे राजकीय वतुर्ळात चर्चेला उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, पटेल यांनी जे विधान केले, त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसते. मी भाजपबरोबर जायला पाठिंबा दिला, असे ते म्हणाले; पण भाजपमध्ये कुणी गेले का? तर अजिबात नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांच्याबाबत केलेला दावा फेटाळून लावला.
हे ही वाचा :