

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष असून, जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष होणे आणि पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरणे बेकायदेशीर आहे, असे उत्तर शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगला ई-मेलच्या माध्यमातून दिले आहे. पक्ष सोडलेल्या ९ मंत्र्यांसह ३१ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणीही शरद पवारांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट नाही. ते पक्षाचे अध्यक्ष असून जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, शरद पवार यांच्यासोबत आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार गट पक्षावर दावा कसा करू शकतो, असा सवाल करत अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष होणे आणि पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरणे बेकायदेशीर आहे. पक्ष सोडलेल्या ९ मंत्र्यांसह ३१ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार यांनी निवडणूक आयाेगाकडे केली आहे.
२ जुलै २०२३ रोजी अजित पवारांसह ४० आमदारांसह महाराष्ट्र सरकारमध्ये सामील झाले होते. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. त्याच वेळी, अजित पवार गटाने निवडणूक आयोगात याचिका दाखल केली हाेती. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत, असा दावा करत अजित पवार गटाने याबाबतची कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सुपूर्दही केली होती. यावर उत्तर देण्यासाठी आयोगाने शरद पवार गटाला तीन आठवड्यांचा (९ सप्टेंबर) वेळ दिला होता. दिल्लीत होणाऱ्या G-20 परिषदेमुळे निवडणूक आयोगाचे कार्यालय बंद आहे, त्यामुळे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांचे पक्षावरील सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा :