पाच हजार रुपयांची मागणी केल्‍याप्रकरणी पंटर मुबारक मुजावर याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पाच हजार रुपयांची मागणी केल्‍याप्रकरणी पंटर मुबारक मुजावर याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

शाहूवाडी : पाच हजारांची लाच मागितल्‍याप्रकरणी मंडल अधिकार्‍यासह पंटरवर गुन्हा दाखल

Published on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा
शेतजमीन वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे याच्यासह पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा. विशाळगड, ता-शाहूवाडी) याच्याविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२१) सकाळी गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी  माहिती दिली

तक्रारदार व्यक्तीने शेत जमीन वारस नोंदीसाठी मंडलाधिकारी (आंबा ) संतोष सांगडे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.त्यानंतर तथापि पंटर मुबारक मुजावर यांच्यामार्फत मंडळ अधिकारी यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे, चौकशीत निष्पन्न झाल्याने सांगडेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील पंटर मुबारक मुजावर यास अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित संतोष सांगडे याला लवकर अटक करण्यात येईल, असेही आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news