Jawan Movie
Jawan Movie

Shah Rukh Khan : शाहरुख खानला झटका! ‘या’ देशात ‘जवान’चे स्क्रिनिंग थांबवले, कारण…

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' हा चित्रपट गुरुवारी जगभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. शाहरुखचा चाहता वर्ग केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे आणि तिथेही या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण किंग खानसाठी एक वाईट बातमी आहे. बांगलादेशच्या सेन्सॉर बोर्डाने जवान चित्रपट प्रदर्शित होण्यास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट नियोजित 7 सप्टेंबर या तारखेला बांगलादेशमध्ये प्रदर्शित होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता बांगलादेशी चाहत्यांना शाहरुखच्या जवानची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

काय आहे कारण?

बांगलादेशात जवान चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे. याआधीही शाहरुखचा (Shah Rukh Khan) पठाण हा चित्रपट आला होता आणि तो बांगलादेशात प्रदर्शित करण्यात अडचणी आल्या होत्या. मात्र, यावेळी असे होणार नसल्याचे शाहरुखने सांगितले होते. पण आता जवान चित्रपटाबाबतही तेच घडत आहे. अहवालानुसार, बांगलादेशच्या सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर फक्त मर्यादित संख्येत भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली जाणार आहे, अशीही माहिती समोर येत आहे.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

चित्रपट पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आत्तापर्यंत आलेल्या प्रतिक्रिया बर्‍यापैकी सकारात्मक आहेत. शाहरुखचा (Shah Rukh Khan) अभिनय, चित्रपटाची कथा, दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा अभिनय चाहत्यांना आवडला आहे. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पहिल्या दिवसाची कमाई

रिपोर्टनुसार, चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये 75 कोटींची कमाई केली आहे. शाहरुखच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाका केला आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी 70 कोटींपर्यंत कमाई करू शकतो, असा अंदाज याआधीच वर्तवला जात होता. तो अंदाज खरा ठरला आहे. जगभरात जवान चित्रपट 140 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा आहे, मात्र याबाबतची माहिती अद्याप आलेली नाही. जगभरातील कमाईही गुरुवारी संध्याकाळपर्यंत कळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news