shahrukh-gauri-abram
shahrukh-gauri-abram

Shahrukh Khan : शाहरुखने ‘मन्नत’वर फडकावला तिरंगा ध्वज (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षीप्रमाणे यावेळीही शाहरुख खानने मन्नत बंगल्यावर तिरंगा ध्वज फडकावला. (Shahrukh Khan) यावेळी त्याच्यासोबत गौरी खान आणि अबरामदेखील होता. शाहरुखने काही सेकंदापूर्वी   इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Shahrukh Khan) शाहरुख खानने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे-'आता चिमुकल्यांनी ही परंपरा जपली आहे. आपला लाडका तिरंगा फडकावून. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. सर्वांवर प्रेम करा आणि आपला देश, भारत आणि आपल्या सर्वांची प्रगती होवो.'

ट्विटरवर एका फॅन क्लबने मन्नत बंगल्याबाहेरील गर्दीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. अनेक चाहत्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

देशभरात 'हर घर पर तिरंगा' मोहिमेसाठी आवाहन करण्यात आले आहे. यावेळी शाहरुख खान, गौरी आणि अबरामने पांढरे कपडे परिधान केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

video- Javed (Fan) twitter account वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news