पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी शादाब खानची निवड

पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी शादाब खानची निवड
Published on: 
Updated on: 

कराची, वृत्तसंस्था : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी शादाब खान याची निवड करण्यात आली आहे. नियमित कर्णधार बाबर आझम या मालिकेत सहभागी होणार नसून त्याचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

सध्या पाकिस्तानमध्ये पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग खेळली जात आहे आणि जवळपास सर्वच मोठे खेळाडू त्यात सहभागी झाले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानी संघाला आता काही दिवसांनंतर अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. याआधी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

पीसीबीने शादाब खान संघाचा नवा कर्णधार असल्याची घोषणा केली आहे. कर्णधारासोबतच संघातील 15 सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघाची खास बाब म्हणजे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसोबत शाहिन शाह आफ्रिदीचे नाव नाही. शादाब खान अफगाणिस्तानविरुद्ध संघाची धुरा सांभाळताना दिसणार असल्याची घोषणा पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी केली आहे. संघाची घोषणा करताना पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले, शादाब खानची पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करू इच्छितो. शादाब खान गेल्या काही वर्षांपासून व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा उपकर्णधार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news