कोल्हापूर जिल्ह्यात खुनांची मालिका; गुंडांची दहशत

file photo
file photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात संघटित टोळ्यांचे थरकाप उडविणारे कारनामे बेधडक सुरू आहेत. भरचौकात पाठलाग करून भरदिवसा मुडदे पाडले जात आहेत. गुन्हेगार एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत आहेत. एकाच दिवशी तीन-तीन खून पडत आहेत. गुटखा, बनावट दारू, ड्रग्ज तस्करी जोरात सुरू आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली उच्चभ—ू वसाहतीत, लॉजवर वेश्या अड्ड्यांचे रॅकेट रात्रंदिवस सुरू आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिस यंत्रणेचा धाक आहे की नाही, अशी स्थिती आहे.

परप्रांतीय गुंडांचा जिल्ह्यात मुक्त संचार

कोल्हापूर शहर, इचलकरंजीसह ग्रामीण भागात काळ्या धंद्यातून मिळणार्‍या कमाईमुळे संघटित टोळ्यांचे म्होरके सोकावू लागले आहेत. खासगी सावकारांची दहशत वाढू लागली आहे. तीन पानी जुगार अड्ड्यांवर गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्यांची वर्दळ वाढू लागली आहे. सीमाभागातील माफियांसह तस्करी टोळ्यांची उलाढाल वाढत आहे.

वरिष्ठांच्या आदेशाला कोलंदाडा

लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकार्‍यांसह यंत्रणेला काळे धंदेवाले, तीन पानी जुगार अड्डे, उच्चभ्रूवसाहत, महामार्गावर चालणार्‍या हायप्रोफाईल वेश्या अड्ड्यांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. गुटखा, बनावट दारूसह अमली पदार्थांची तस्करी मोडीत काढण्याचे निर्देश दिले होते. मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या गैरप्रकारांविरुद्ध सक्त आदेश असतानाही जिल्ह्यात सारे धंदे खुल्लम खुल्ला सुरू आहेत.

मार्च 2024 मधील खुनाच्या घटना

* इचलकरंजी : रोहित बाळू तडाखे याचा खून : संदेश पाथरवट, राहुल पाथरवट बंधूंसह साथीदार जेरबंद.

* गडहिंग्लज (उत्तूर) : प्रियकराचा खून करून मृतदेह परस्पर जाळण्याचा प्रयत्न : महिलेसह तिघांना अटक

* चंदगड : हजगोळी येथे वसंत पांडुरंग पाटील (वय 65) या वृद्धाचा खून.

* करवीर : आयपीएल वादातून हणमंतवाडी (ता. करवीर) येथील बंडोपंत बापू तिबिले (वय 63) यांच्यावर जीवघेणा हल्ला; खुनाचा गुन्हा.

* गडहिंग्लज : नाश्ता दिला नाही म्हणून सुशीला मारुती बोळाज (वय 50, रा. खणदाळ) यांचा खून : पतीला अटक.

* हातकणंगले : रूपाली दादासाहेब गावडे (वय 28, रा. हिंगणगाव) हिचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून ः संशयित जेरबंद.

दि.1 ते 4 एप्रिल काळातील खुनाच्या घटना

* वर्चस्ववादातून रंकाळा टॉवर चौकात भरदिवसा अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे (वय 35, रा. यादवनगर) याचा खून

* उच्चशिक्षित युवती वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय 24, रा. शनिवार पेठ) हिला आई, भावासह तिघांकडून अमानुष मारहाण : उपचारादरम्यान मृत्यू

* हुतात्मा पार्कमधील ओढ्यात आढळला शिर नसलेला मृतदेह : खुनाचा संशय

संघटित टोळ्यांचे कारनामे

* कोल्हापूर : नंग्या तलवारींसह धारदार शस्त्रे नाचवत टेंबलाई नाका झोपडपट्टी परिसरात ताराराणी चौक परिसरातील जमावाचा हल्ला. 10 वाहनांची तोडफोड; घरावर तुफान दगडफेक, टपर्‍यांसह हातगाड्यांचे नुकसान, संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर फेकले; 39 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, संशयितांत अल्पवयीन कॉलेज तरुणांचा समावेश

* कोल्हापूर : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची जामिनावर सुटका झाल्यानंतर आलिशान मोटारीतून कळंबा कारागृहापासून मिरवणूक : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 8 जणांवर गुन्हा

* इचलकरंजी : धुळवडीच्या दिवशी इचलकरंजीत एसटीसह चारचाकी वाहनांवर दगडफेक, टेंपोच्या काचा फोडल्या, दुकानांचे नुकसान : प्रचंड दहशत माजवण्याचा प्रयत्न.

* कोल्हापूर : पापाची तिकटी परिसरात तीन पानी जुगार अड्ड्यावर जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषणचा छापा : 30 जणांना अटक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news