

पुढारी ऑनलाईन डेस्क : संभलचे समाजवादी पार्टी खासदार शफीकुर्रहमान यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुरादाबाद येथील सिद्ध हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. (Shafiqur Rahman Barq ) मागील काही काळापासून त्यांचे प्रकृती ठिक नव्हती. अशक्तपणा आणि लूज मोशनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना किडनीमध्ये इन्फेक्शनची समस्या सांगतली होती.
दरम्यान समाजवादी पार्टीने एक्स अकाऊंटवर ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Shafiqur Rahman Barq)
शफीकुर्रहमान यांचा जन्म ११ जुलै, १९३० रोजी झाला होता. चौधरी चरण सिंह यांच्यासोबत त्यांनी राजकारणात येऊन सुरुवात केली होती. ते बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटीचे संयोजकदेखील राहिले. त्यांनी समाजवादी पार्टीच्या स्थापनेदरम्यानही त्यांनी मुलायम सिंह यादव यांच्यासोब मिळून काम केलं होतं. त्यांना सपाचे संस्थापक सदस्यही म्हटले जाते.
संभलमधून सपा खासदार म्हणून ५ वेळा त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला. १९९६, १९९८, २००४ मध्ये समाजवादी पार्टीकडून मुरादाबाद लोकसभेच्या जागेवर ३ वेळा विजय मिळवला. पुढे २००९ मध्ये बसपाच्या तिकिटावर संभलमधून लोकसभेची निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये संभलमधून पुन्हा विजय मिळवला होता.
पंतप्रधान मोदी यांनी एकदा बर्कचे कौतुक केले होते. २०२३ च्या नव्या लोकसभेत पीएम नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणावेळी बर्क यांच्याबद्दल म्हटले होते-वयाच्या ९३ व्या वर्षी डॉ शफीकुर्रहमान बर्क या सभागृहात बसले आहेत. सभागृहाच्या प्रती अशी निष्ठा असायला हवी.