पुणे : सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा डिसेंबरमध्ये

पुणे : सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा डिसेंबरमध्ये

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरिता विविध संवर्गांसाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा 1 व 2 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहणार आहे. संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण, दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

विविध विभागांतील मुख्य प्रशासकीय अधिकारी गट 'अ', प्रशासकीय अधिकारी गट 'ब' व सहायक प्रशासन अधिकारी गट 'ब' संवर्गासाठी एकत्रित चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकत्रित चाळणी परीक्षेमधील गुणांच्या आधारे अर्ज केलेल्या संबंधित संवर्गाच्या निवडीसाठी गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचा विचार करण्यात येईल.

तसेच एकत्रित परीक्षेमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या परीक्षेची माहिती उदा., शासनाचा विभाग, संवर्ग, परीक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षेची तारीख यासंदर्भातील सविस्तर माहिती लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news