

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सामान्य कुटुंबातील मुलांनादेखील देशभरातील राष्ट्रीयस्तरावरील शिक्षण संस्थेत प्रवेश घेता येणार आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण विभागाकडून राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील एम्स, आयआयएम, आयआयआयटी, नीट, आयआयएससी, आयसर, इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स अँड कॉलेजेससारख्या मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणे आता सोपे झाले आहे.
अनुसूचित जाती – नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण विभागाकडून राबविली जात आहे. राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या – नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी संपूर्ण कागदपत्रासह 14 ऑगस्टपर्यंत आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.
हेही वाचा