

'15 जी' आणि '15 एच' फॉर्म भरून संबंधित व्यक्ती हा आपण प्राप्तिकर कक्षेत येतो की नाही, हे सांगत असतो. या आधारे टीडीएस कपात वाचवता येणे शक्य आहे. भारतातील एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्षात दहा हजारांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर बँकेकडून टीडीएस कपात केली जाते. एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न करमर्यादापेक्षा कमी असेल, तर तो '15 जी आणि '15 एच' फॉर्म भरून टीडीएस कपात न करण्याची विनंती करू शकतो. '15 जी' आणि '15 एच' फॉर्ममध्ये किरकोळ फरक आहे. 15 एच फॉर्म हा 60 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना भरावा लागतो, तर फॉर्म 15 जी हा अन्य लोक भरू शकतात.