Asian Games Badminton : सात्विक-चिराग जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, श्रीकांतची विजयी सलामी

Asian Games Badminton : सात्विक-चिराग जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, श्रीकांतची विजयी सलामी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games Badminton : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सोमवारी (2 ऑक्टोबर) पुरुष एकेरीत आपला पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. त्याने राऊंड ऑफ 64 च्या सामनयात व्हिएतनामच्या ले डक फाट याचा 21-10, 21-9 असा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना फक्त 29 मिनिटांमध्ये संपला.

बॅडमिंटन क्रमवारीत 21व्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण ठेवले आणि जबरदस्त स्मॅशद्वारे प्रतिस्पर्धी व्हिएतनामी खेळाडूवर दबाव ठेवला. श्रीकांतच्या वेगाशी ले डक बरोबरी करण्यात असमर्थ ठरला. त्यामुळे श्रीकांतने पहिला गेम 21-10 असा आरामात जिंकला. (Asian Games Badminton)

ले डक फाटने दुसऱ्या गेममध्ये आक्रमक सुरुवात केली. त्याने सुरुवातीचे काही गुण मिळवून आघाडी घेतली. पण श्रीकांतने आपला गिअर बदल खेळात पुन्हा वेग पकडला आणि 11-7 अशी आघाडी घेतली. ही आघाडी त्याने शेवटपर्यंत कायम ठेवली आणि हा गेम 21-9 ने जिंकला.

दुसरीकडे पुरुष एकेरीच्या राऊंड ऑफ 64 मध्ये एचएस प्रणॉयला बाय मिळाला. प्रणॉय हा रविवारी झालेल्या पुरुषांच्या सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.

श्रीकांत आणि प्रणॉय मंगळवारी आपापल्या पुरूष एकेरीच्या राऊंड ऑफ 32 मधील सामने खेळण्यासाठी कोर्टवर उतरतील. श्रीकांतची लढत द. कोरियाच्या युंग्यु लीशी होणार आहे, तर प्रणॉयचा सामना मंगोलियाच्या बतदावा मुंखबातशी होणार आहे. (Asian Games Badminton)

दरम्यान, के साई प्रतीक आणि तनिषा क्रास्टो यांनी मिश्र दुहेरीच्या 16 व्या फेरीत प्रवेश केला. या भारतीय जोडीने मकाओ चीनच्या इओक चोंग लिओंग आणि एनजी वेंग ची यांचा 21-18, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला.

भारताची स्टार दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी राऊंड ऑफ 32 च्या फेरीत हाँगकाँग चीनच्या हिन लाँग चाऊ आणि चुन वाई लुई यांचा 21-11, 21-16 असा पराभव केला. याचबरोबर भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सात्विक-चिराग जोडी इंडोनेशियाच्या डॅनियलशी मार्थिन आणि लिओ रॉली कार्नांडो या जोडीला भिडणार आहे.

दोन वेळाची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मंगळवारी तिच्या महिला एकेरी मोहिमेची सुरुवात करेल. तिचा पहिला सामना चायनीज तैपेईच्या हसू वेन-ची विरुद्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news