File Photo
Latest
सातारा : वाढे फाटा येथे दुकानांना भीषण आग
सातारा: पुढारी वृत्तसेवा पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहरालगत वाढे फाटा येथे आज (बुधवार) पहाटे काही दुकानांना भीषण आग लागली. ही बाब समोर येईपर्यंत आगीने अक्षरशः तांडव केला. सुमारे 4 ते 5 दुकाने जाळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
वाढे फाटा हा परिसर वर्दळीचा असून, अनेक लहान – मोठे व्यवसायिक आहेत. पहाटे मात्र परिसरातून धुराचे लोट व नंतर आगीने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. ही घटना समोर आल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. प्राथमिक माहितीनुसार टायरचे दुकान, चहा, चप्पलचे दुकान यांना ही आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
हेही वाचा :

