सातारा : ऊसाच्या शेतात सापडलेली बिबट्याची बछडे मातेच्या कुशीत…

बिबट्याची बछडी मातेच्या कुशीत
बिबट्याची बछडी मातेच्या कुशीत
Published on
Updated on

कराड ; पुढारी ऑनलाईन सोमवार रोजी मौजे हिंगनोळे ता.कराड येथील शेतकरी सौ विद्या निवासराव माने यांच्या उसाच्या शेतात तोड सुरू असताना दुपारी सुमारे 1 वाजता बिबट्याची दोन बछडी सरीत आढळली.

ऊसाच्या शेतात बिबट्याची दोन बछडी सापडल्‍याची माहिती वनपाल सागर कुंभा र यांना मिळाली. या माहितीवरून त्‍यांनी घटनास्‍थळी जात दोन्ही बछड्यांना आपल्‍या ताब्‍यात घेतले. सदर बिबट्याची  बछडी ही नवजात होती. त्‍यांचे अजुनही डोळे उघडायचे होते. मादी बिबट्या ही जवळपासच असणार हे ओळखून वाईल्ड लाईफ रेस्कूअर्स कराड च्या टीमला पाचारण करून मादी व बछडी यांचे पुनर्मिलन घडवून आणण्याचा निर्णय परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांनी घेतला.

संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास विशिष्ट व्यवस्था करून बिबट्याची दोन्ही पिल्ले क्रेटमध्ये सापडलेल्या ठिकाणी कॅमेरे लाऊन पुन्हा ठेवण्यात आली.

मादी बिबट्या संध्याकाळी 7.30 वाजता येऊन आपले एक पिल्लू अलगदपणे घेऊन गेली. सदर पहिले पिल्लू सुरक्षित ठिकाणी ठेवून पुन्हा दुसऱ्या पिल्लूसाठी मादी बिबट्या 8.20 वाजता आली व दुसरे पिल्लू ही सुरक्षित घेऊन गेली.

वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनक्षेत्रपाल परिविक्षाधीन सुजाता विरकर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह सदर कारवाईमध्ये वनपाल सागर कुंभार, वनरक्षक सचिन खंडागळे, मेजर अरविंद जाधव, वनसेवक शंभूराज माने यांनी सहभाग घेतला. तर वाईल्ड लाईफ रेस्कूअर्स कराडचे अजय महाडीक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार, अनिल कोळी, सचिन मोहिते यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news