सराईत गुन्हेगार असिफ दाढी अजित पवारांच्या भेटीला : फोटो व्हायरल

सराईत गुन्हेगार असिफ दाढी अजित पवारांच्या भेटीला : फोटो व्हायरल
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड येथील सराईत गुन्हेगार असिफ दाढी उर्फ दाढी महमद इकबाल शेख (रा. मोरवाडी पिंपरी) याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतेच कुख्यात गुंड गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर असिफ दाढी याच्या भेटीने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई येथे झाली भेट

असिफ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे गेला असल्याची माहिती मिळत आहे. .

खूनासह गंभीर गुन्ह्यांची नोंद

असिफ दाढी याच्यावर सन१९८८ मध्ये मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेचच मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. सन १९९६ मध्ये त्याच्यावर खुनाच्या प्रयत्न हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, सन २००२ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. सन २००४ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झाला. सन २००७ मध्ये खुनासाठी अपहरण करून खून असा गुन्हा दाखल आहे. सन २००९ आणि सन २०११ मध्ये शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. सन २०२१ साली त्याच्यावर अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला त्याच्या घरातून शस्त्रासह अटक केली होती.

खा. श्रीकांत शिंदे आणि गुंड हेमंत दाभेकर भेट

महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत! या फोटोनंतर ही भेट घडवून आणणाऱ्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षकाची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याची पार्थ पवारांसोबत भेट

कोथरुडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याने काही दिवसापुर्वी पार्थ पवार यांची भेट घेतली होती. मारणेने पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारणेने पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आता सराईतप गुन्हेगार असिफ दाढीची अजित पवारांसोबत भेट हा मुद्दाही राजकिय वर्तुळात पेटतांना दिसत आहे.. मारणेविरुद्ध खून, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणे टोळीची कोथरुड, तसेच शहरात दहशत आहे. मारणेचे पत्नी जयश्री या मनसेच्या नगरसेविका होत्या.

एकूणच गुंड प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीसोबत राजकारण्यांच्या होत असणाऱ्या भेटी, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवत आहेत. यामुळे विरोधकांनी सत्ताधारी सरकारला चांगलेच धारेवर धरलेले दिसत आहे.

हेही वाचा   

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news