मुसेवाला ह्त्त्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संतोष जाधव व नवनाथ सूर्यवंशीसह पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक
मुसेवाला ह्त्त्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संतोष जाधव व नवनाथ सूर्यवंशीसह पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक

मुसेवाला हत्या : संतोष जाधवचे कॅनडातील गँगस्टर गोल्डीशीही कनेक्शन

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध गायक आणि कँाग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्त्याप्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव हा कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याशी थेट संपर्कात असल्याचे समोर आले आहे. गोल्डीनेच मुसेवाला यांच्या हत्त्येची जबाबदारी स्विकारल्याचे जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली होती.

गोल्डीने मुसेवालाच्या हत्त्येची जबाबदारी स्विकारल्यानंतर इंटपोलनेही त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर संतोष जाधवचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला आणि त्यांनीत्या दिशेने तपास सुरू केला.

गोल्डी ब्रारच्या माध्यामतूनच संतोष लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आल्याचे तपासात समोर आले आहे. महाकाळ व सूर्यवंशी हे जाधवच्या माध्यमातून या टोळीच्या संपर्कात आले. राजस्थान, हरियाणा, पंजाब येथे त्यांनी रेकी केल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news