T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड! पठाणने सॅमसन, राहुल, गायकवाडला दिला डच्चू

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड! पठाणने सॅमसन, राहुल, गायकवाडला दिला डच्चू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : एकीकडे आयपीएल 2024 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे, तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पुढच्या टप्प्यासाठी तयारी करत आहे. बोर्ड या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 साठी संघाची निवड करेल. कर्णधार रोहित शर्मा आणि काही खेळाडूंची जागा निश्चित मानली जात आहे. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सतत फॉर्मशी झुंजत असला तरी त्याची निवड होणार असल्याचे मानले जात आहे. अशातच काही फॉर्ममध्ये असणा-या खेळाडूंना संघात स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.

पंड्याची निवड, शिवम दुबेही यादीत

दरम्यान, भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी आपला संघ निवडला आहे. हार्दिक पंड्याच्या कामगिरीवर ट्विटरवर सातत्याने टीका करणाऱ्या इरफान पठाणने मात्र विश्वचषक संघात त्याला स्थान दिले आहे. यासोबतच शिवम दुबेलाही संघात ठेवले आहे. पठाणने सलामी फलंदाज म्हणून रोहित शर्मा सोबत यशस्वी जैस्वाल पसंती दिली आहे. त्याच्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, शुभमन गिल 15व्या क्रमांकावर दिसत आहे.

केएल राहुल आणि संजू सॅमसनला स्थान नाही

सध्याच्या आयपीएलमध्ये सॅमसन आणि राहुल यांची कामगिरी चांगली होत आहे. पण तरीही पठाणच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याने ऋषभ पंतची यष्टीरक्षक म्हणून निवड केली आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय अर्शदीपही तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मारा करेल. रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव फिरकीचे जबाबदारी सांभाळतील.

टी-20 विश्वचषक 2024 साठी इरफान पठाणने निवडलेला भारतीत संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, शुभमन गिल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news