

जत; पुढारी वृत्तसेवा : तुम्ही माझे लग्न का लावून देत नाही? अशी विचारणा करीत कोंतेवबोबलाद (ता. जत) येथे मुलाने आई-वडिलांवर कुर्हाडीने हल्ला केला. तसेच मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संशयित आमसिद्ध रामू यरनाळ (रा.कोंतेवबोबलाद) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद रामू मल्लाप्पा यरनाळ यांनी उमदी पोलिसांत दिली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आमसिद्धने वडील रामू यरनाळ व आई ललिता यांच्याकडे, माझे लग्न तुम्ही लावून द्या, असे म्हणत वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. नंतर आमसिद्धने वडील रामू यरनाळ यांच्या पायावर कुर्हाडीने घाव घातला. यात ते गंभीर जखमी झाले. त्याचबरोबरच भावास धमकी देत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आई ललिता यांनाही मारहाण केली.