सांगली : अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण ‘त्‍या’ रेक्टरवर कारवाईची मागणी

सांगली : अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण ‘त्‍या’ रेक्टरवर कारवाईची मागणी
Published on
Updated on

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : शाळेच्या नावावर हॉटेलमधून चहा आणला, या रागातून शहरातील एका बड्या विद्यालयाच्या वसतिगृहातील रेक्टरने अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर बाब लक्षात येताच पालकांनी वसतिगृहात येऊन विद्यार्थ्यांना घरी नेले. या दोन्ही विद्यार्थ्यांवर गावातील एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत. संबंधित रेक्टरवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे केली आहे.

सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे जितेंद्र दरीनाथ बजबळे आणि बालाजी दरीनाथ बजबळे हे जुळे भाऊ तासगाव शहरातील एका बड्या विद्यामंदिरात सहावीच्या वर्गात शिकायला आहेत. दोघे भाऊ विद्यामंदिराच्या वसतिगृहात राहतात.

रविवारी सकाळी वतिगृहातील विद्यार्थी बाहेर जाऊन चहा घेऊन आले होते. त्या सर्वांनी वसतिगृहामध्ये चहा घेतला. हे निदर्शनास येताच शिपायाने त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. नंतर वसतिगृहाच्या रेक्टरने प्लंबिंग पाईपने या दोन जुळ्या भावांसह चार विद्यार्थ्यांना अमानुषपणे बदडून काढले.

मारहाणीमुळे घाबरलेल्या बालाजी बजबळे या विद्यार्थ्याने एका शिक्षिकेचा मोबाईल घेऊन घरी वडिलांना सर्व हकीकत सांगितली. यानंतर त्याचे वडील तासगाव येथील वसतिगृहात येऊन दोन्ही मुलांना घरी घेऊन गेले आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

विद्यार्थ्यांकडून आत्महत्येचा इशारा 

बालाजी बजबळे या विद्यार्थ्यांने वडिलांना फोन करून मारहाणीची माहिती दिली. त्यावेळी वडिलांनी याबाबत शिक्षकांना जाब विचारु का असे विचारले होते, परंतु विद्यार्थ्यांने ठाम नकार दिला. तुम्ही शाळेत विचारणा कराल तर रेक्टर आम्हाला आणखी मारतील, तुम्ही जर आजच्या आज आम्हाला इथून घेऊन गेला नाही, तर जिवाचं काहीतरी करुन घेऊ असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळेच वडील तात्काळ येऊन त्यांना घरी घेऊन गेले आहेत.

मुख्याध्यापकाची शाळेतून काढून टाकण्याची धमकी 

अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्यानंतरही संबंधित शाळा प्रशासनाला बाब गांभीर्याने घ्यावी वाटलेले नाही. मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून याबाबत कुठे वाच्यता करु नका. नाहीतर माझ्याकडे मुलांनी गैरवर्तन केलेले सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याच्या आधारे मी दोघांना थेट शाळेतून काढून टाकीन, असा धमकीवजा इशारा दिला आहे.

रेक्टरचे विद्यार्थ्यांसमोरच मद्यप्राशन

मारहाण करणारा रेक्टर नेहमीच त्रास देत असतो. शिवाय तो विद्यार्थ्यांसमोरच दारू पितो, सिगारेट ओढतो. अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. शिवाय घरी कळवले तर मारहाण करतो. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news