दमदार फिचर्सचा Samsung Galaxy A53 5G लॉन्च, सोबत 3 हजार Cashback सुद्धा !

दमदार फिचर्सचा Samsung Galaxy A53 5G लॉन्च, सोबत 3 हजार Cashback सुद्धा !
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सॅमसंग कंपनीने नविन Galaxy A53 हा 5G स्मार्टफोन ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. या फोनमधील महत्त्वाच्या फिचरपैकी एक म्हणजे 120 Hz रिफ्रेश रेट आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च करण्यात आला आहे.

पहा काय आहेत मोबाईल फिचर आणि किंमत

सॉफ्टवेअर : या फोन मध्ये Android 12 यावर आधारित One UI 4.1 असे सॉफ्टवेअर आहे.

डिस्प्ले : 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंच असलेला फुल-एचडी + सुपर मोलेड इन्फिनिटी-ओ असा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.

प्रोसेसर, रॅम सह स्टोरेज : मोबाईलचे स्पीड आणि मल्टीटास्किंग यासाठी, 8 GB पर्यंत RAM आणि 128 GB स्टोरेज तर ऑक्टा-कोर Exynos 1280 प्रोसेसर आहे. आणि वापरकर्त्यांच्या सोईसाठी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येईल.

कॅमेरा : मागील बाजूस चार रिअर कॅमेरे, यामध्ये 64 मेगापिक्सेलचा, 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटी : यामध्ये सध्या सतत लागणारे Wi-Fi 802.11 AC, 4G LTE, 5G, GPS, A-GPS, USB Type-C पोर्ट, GPS, A-GPS आणि ब्लूटूथ आवृत्ती 5.1 सपोर्ट उपलब्ध असतील. आणि सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी : याची 5000 mAh अशी बॅटरीसह 25 W फास्ट चार्जिंग असेल.

तसेच यामध्ये 6/ 128 जीबीची किंमत 34,499 रुपये असून 8 /128 जीबीची किंमत 35,999 रुपये एवढी असेल. हा फोन कंपनीच्या अधिकृत साइटवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर हा फोन 27 मार्चपासून ब्लू, ब्लॅक आणि व्हाइट आणि पीच रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. प्री-बुकिंग कालावधी दरम्यान ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर 3000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news