तडका : तात्या पिसाळला!

पेठेतील एक चौक. बाबुराव आणि बापुराव कट्ट्यावर गप्पा मारीत बसले आहेत.
Pudhari Editorial Tadaka
तडका : तात्या पिसाळला!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

(पेठेतील एक चौक. बाबुराव आणि बापुराव कट्ट्यावर गप्पा मारीत बसले आहेत.)

बाबुराव : काय बापुराव, तुमच्या गावची काय हालहवाल?

बापुराव : काय तसं न्हाय खरं, पर आमच्या शेजारच्या गावच्या तात्या सरपंचाने डाळ म्हाग केलीया न्हवं!

बाबुराव : असं का? कोण ह्यो सरपंच, काय आबाळातनं पडलाय काय त्यो?

बापुराव : आवं, तुमाला त्यो तात्या लांबकाने म्हाईत हाय न्हवं? त्योच त्यो इदरकल्यानी! त्योच त्या वसाडवाडीचा सरपंच हाय!

बाबुराव : आवं, पण त्येनं आसं क्येलं तरी काय? सांगा तरी उलगडून!

बापुराव : बाबुराव, आमच्या गावाचं दूध-दुभतं सार्‍या पंचक्रोशीत न्हवं, तर सार्‍या जिल्ह्यात म्हशूर हाय. खरं का न्हाई?

Pudhari Editorial Tadaka
Tadaka Article | मार्ग समृद्ध, पण..!

बाबुराव : व्हय तर! आवो, दूध-दुभत्याला तुमचा नंबर पैला संघामध्ये. तुमचंच दूध सगळ्यात भारी, जादा फ्याटचं आनि सगळ्यात उजवं!

बापुराव : तर घोळ असा की, या तात्या लांबकान्यानं पंचक्रोशीत दौंडी दिलीय, आमच्या गावचं म्हंजे दूधवाडीचं दूध कुनी घ्याचं न्हाई आणि घ्येतलं, तर वसाडवाडीला दंड भरायचा.

बाबुराव : आनि वो, मग कसं वो?

बापुराव : ऐका तर खरं! समद्या गावास्नी तात्यानं दम भरलाय. परत आमास्नी त्येंच्या गावचा चाराबी बंद केलाय.

बाबुराव : चांगलाच दांडगावा हाय की!

बापुराव : येवढ्यानं काय हुतंया? आवो, आमी त्या चंदनवाडीस्नं गुरांसाठी खाद्य आनतो. तात्यानं त्याला बी आडवा पाय मारला की!

Pudhari Editorial Tadaka
Pudhari Editorial : वर्चस्वाचा खेळ!

बाबुराव : म्हंजे, या तात्याचं डोस्कं पाक फिरलंय म्हणा की!

बापुराव : आवं, त्येनं आमाला भायेरच्या कुठल्या बाजारातनं जनावरं आनायला आनी विकायला दंड बशीवलाय न्हवं!

बाबुराव : ह्ये म्हंजे आगाऊपणाचा कळसच झाला म्हना की! आवं, मग तुमी आजपतोर गप का बसलाईसा?

बापुराव : आमी काय बांगड्या भरल्यात व्हय! आमी काय मेलेल्या आयीचं दूध प्यालेलो न्हाई. कुत्रं पिसाळतंय तसा ह्यो तात्या पिसाळलाय.

आमी पन सार्‍या गावास्नी सांगावा दिलाय. तात्याचा डाव मोडून काढायचा शड्डूच ठोकलाय.

बाबुराव : शाब्बास पठ्ठे! कुनापुढं मान वाकवायची न्हाई. त्यो तात्या आसू दे, न्हाई तर तेचा बा आसू दे! आमी हाय तुमच्या संगट.

- पठ्ठे बाजारीव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news