मला एक सांग मित्रा, राजकारणात विजय आणि पराभव होत असतात. विजयाचा जल्लोष होतो, तर पराभव जिव्हारी लागत असतो, तरीही कोणीही कधी ‘राजकारण गेलं चुलीत’ असे का म्हणत नसेल?
अरे, सोपे आहे. सर्वात प्रथम एक समजून घे की, राजकारण ही एक नशा आहे, असे समजून घेतले की, ते का सुटत नाही, याचे उत्तर सहज सापडते. एकदा का तुम्ही राजकारणात उतरलात की, मग यातून बाहेर पडण्याचा रस्ता उरलेला नसतो. याचा अर्थ कीर्तीच्या शिखरावर असलेल्या कुणीही राजकारण कधीही सोडलेले नाही, असे तुला म्हणायचे आहे काय?
हे बघ, याची सुरुवात कशी होते ते समजून घे! एखादा व्यक्ती सार्वजनिक जीवनात हळूहळू सक्रिय व्हायला लागतो. त्याला आज ना उद्या सक्रिय राजकारणात यायचे असते. राजकारणाचा पहिला टप्पा समाजकारण असतो. याचा अर्थ आपल्या कॉलनीमधील, गल्लीमधील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस तरुण मुलगा हा उद्याचा नगरसेवकपदाचा उमेदवार असतो, हे तू समजून घे! एकदा का तो नगरसेवक झाला की, त्याला महापौर होण्याची महत्त्वाकांक्षा असते. महापौरपदाची एखादी कारकीर्द चांगली गेली की, त्याला आमदारकीची स्वप्ने पडायला लागतात. आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहून तो निवडून आला, तर तत्काळ मंत्री होण्याच्या द़ृष्टीने कार्यरत होतो. समजा त्याचे मंत्री होणे निश्चित असेल, तर तो मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करतो.
नाहीच मिळाले मुख्यमंत्रिपद तर किमान उपमुख्यमंत्रिपद तरी मिळावे, यासाठी प्रत्येकाची धडपड असते. समजा ही दोन्ही पदे मिळाली नाहीत, तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, यासाठी तो जोर लावत असतो. एकदा का कॅबिनेट मंत्रिपदासाठी त्याचे नाव निश्चित झाले की, मग मलईदार खाते मिळण्यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. पराभवामुळे निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश करता आला नाही, तर पक्षामधील वजन वापरून मागच्या दाराने लोक विधान परिषदेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात.
याचा अर्थ, राजकारण हे न संपणारे चक्र असते. म्हणूनच बहुधा कोणीही ‘राजकारण गेलं चुलीत’ असे म्हणत नाहीत.
तुला वाटते तेवढे हे सोपे नाही. समजा एखादा उमेदवार नगरपालिकेची वॉर्डातील निवडणूक हरला, तर तो शांत बसत नाही. दुसर्या दिवशीपासून तो कामाला लागतो आणि पाच वर्षांनंतर येणार्या निवडणुकीच्या तयारीला लागतो. कित्येक उमेदवार तर असे आहेत की, आयुष्यामध्ये किमान सात ते आठ वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकांमध्ये पराभूत झालेले आहेत; परंतु अजूनही त्यांची उमेद संपलेली नाही. प्रत्येक निवडणुकीत गुलाल उधळण्याच्या उद्देशाने ते उभे राहतात आणि तोंडावर आपटून घेऊन परत फिरतात, तरीही ‘राजकारण गेलं चुलीत’ असे ते म्हणत नाहीत.
मला एक सांग मित्रा, राजकारणात विजय आणि पराभव होत असतात. विजयाचा जल्लोष होतो, तर पराभव जिव्हारी लागत असतो, तरीही कोणीही कधी ‘राजकारण गेलं चुलीत’ असे का म्हणत नसेल?
अरे, सोपे आहे. सर्वात प्रथम एक समजून घे की, राजकारण ही एक नशा आहे, असे समजून घेतले की, ते का सुटत नाही, याचे उत्तर सहज सापडते. एकदा का तुम्ही राजकारणात उतरलात की, मग यातून बाहेर पडण्याचा रस्ता उरलेला नसतो. याचा अर्थ कीर्तीच्या शिखरावर असलेल्या कुणीही राजकारण कधीही सोडलेले नाही, असे तुला म्हणायचे आहे काय?
हे बघ, याची सुरुवात कशी होते ते समजून घे! एखादा व्यक्ती सार्वजनिक जीवनात हळूहळू सक्रिय व्हायला लागतो. त्याला आज ना उद्या सक्रिय राजकारणात यायचे असते. राजकारणाचा पहिला टप्पा समाजकारण असतो. याचा अर्थ आपल्या कॉलनीमधील, गल्लीमधील लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस तरुण मुलगा हा उद्याचा नगरसेवकपदाचा उमेदवार असतो, हे तू समजून घे! एकदा का तो नगरसेवक झाला की, त्याला महापौर होण्याची महत्त्वाकांक्षा असते.
महापौरपदाची एखादी कारकीर्द चांगली गेली की, त्याला आमदारकीची स्वप्ने पडायला लागतात. आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहून तो निवडून आला, तर तत्काळ मंत्री होण्याच्या द़ृष्टीने कार्यरत होतो. समजा त्याचे मंत्री होणे निश्चित असेल, तर तो मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करतो. नाहीच मिळाले मुख्यमंत्रिपद तर किमान उपमुख्यमंत्रिपद तरी मिळावे, यासाठी प्रत्येकाची धडपड असते. समजा ही दोन्ही पदे मिळाली नाहीत, तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, यासाठी तो जोर लावत असतो. एकदा का कॅबिनेट मंत्रिपदासाठी त्याचे नाव निश्चित झाले की, मग मलईदार खाते मिळण्यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. पराभवामुळे निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश
करता आला नाही, तर पक्षामधील वजन वापरून मागच्या दाराने लोक विधान परिषदेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ, राजकारण हे न संपणारे चक्र असते. म्हणूनच बहुधा कोणीही ‘राजकारण गेलं चुलीत’ असे म्हणत नाहीत.