

व्ही. के. कौर
नेपाळमध्ये देशांतर्गत कलह आणि राजकीय रस्सीखेचीने गंभीर रूप धारण केले आहे. नेपाळमधील हिंदू संस्कृती बाह्य शक्तींच्या रडारवर आहे. अलीकडच्या काळात ख्रिश्चन समुदायाची लॉबी दबाव आणत असून पैशाच्या बळावर राजकारण केले जात आहे. दुसरीकडे मुस्लीम समुदायाची लोकसंख्या अचानक वाढताना दिसत आहे. रोहिंग्या समुदायातील नागरिक काठमांडू शहरातही वावरताना दिसतात. या गोष्टी धर्मनिरपेक्षतेच्या नावावर होत असल्या, तरी यापैकी काही गोष्टींकडे राजकीय लाभ म्हणूनही पाहता येईल.
मागील काही काळापासून नेपाळमधील राजकीय चढ-उतार पाहता सर्वसामान्य नागरिक हतबल आणि स्तब्ध झाला आहे. 2008 नंतर नेपाळने 13 पंतप्रधान पाहिले. एकार्थाने या पदाला संगीत खुर्चीचे रूप आले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी स्थापन झालेले ओली सरकार नेपाळमधील अस्थिरता आणि अस्वस्था दूर करेल, असे वाटत होते; परंतु समस्या कमी झालेल्या नाहीत. राजकीय अस्थिरतेमुळे नेपाळच्या विकासाला खिळ बसली आहेच शिवाय पर्यटन व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. नेपाळमधील नेतृत्वात राजकीय कौशल्य आणि दूरद़ृष्टीचा अभाव असल्याने देशाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. नेपाळमध्ये देशांतर्गत कलह आणि राजकीय रस्सीखेचने गंभीर रूप धारण केले आहे. नेपाळमधील हिंदू संस्कृती बाह्य शक्तीच्या रडारवर आहे. अलीकडच्या काळात ख्रिश्चन समुदायाची लॉबी दबाव आणत असून पैशाच्या बळावर राजकारण केले जात आहे. दुसरीकडे मुस्लीम समुदायाची लोकसंख्या अचानक वाढताना दिसत आहे.
तीन दशकांपूर्वी मुस्लीम समुदायाची लोकसंख्या एक टक्क्यांपेक्षा कमी होती आणि आज पाच टक्क्यांपेक्षा अधिक दिसून येते. रोहिंग्या समुदायातील नागरिक काठमांडू शहरातही वावरताना दिसतात. या गोष्टी धर्मनिरपेक्षतेच्या नावावर होत आहेत आणि यापैकी काही गोष्टींकडे राजकीय लाभ म्हणूनही पाहता येईल. नेपाळमधील बदलत्या स्थितीमुळे सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक आधार कमकुवत होत आहे. त्याचवेळी राजकीय आणि आर्थिक संकटदेखील गडद होताना दिसत आहे. नेपाळची आजघडीची स्थिती पाहिली, तर हिंदू संस्कृतीचा पाया मजबूत केल्याशिवाय स्थानिक समस्यांचा निपटारा होऊ शकत नाही, हे कळून चुकते. जनआंदोलनाचे कधीकाळी नायक राहिलेले प्रचंड यांनी नेपाळमध्ये राजेशाहीला तिलांजली देत माओवादी व्यवस्था आणण्यात मोलाची भूमिका बजावली.
त्यांचे शब्द आणि भूमिकादेखील सनातन संस्कृतीचा पुरस्कार करत होते. हीच संस्कृती भारत आणि नेपाळला एकत्र आणण्याचे आणि जोडण्याचे काम करते. भारत आणि नेपाळ यांच्यासारखे संबंध जगभरात अन्य कोणत्याही दोन देशांत पाहावयास मिळणार नाही. त्यामुळे नेपाळमध्ये घडणार्या घडामोडींचा भारतावर सतत अप्रत्यक्षपणे परिणाम झालेला दिसून येतो. नेपाळच्या संस्कृतीचा र्हास हा मुस्लीम समुदायांकडून पसरविला जाणारा फुटिरतावाद आणि ख्रिश्चन समुदायाच्या वाढत्या प्रसारामुळे होत आहे. नेपाळमध्ये ख्रिश्चन समुदायाचा दबदबा गेल्या काही दशकांपासून वाढत असून यात उल्लेखनीय वाढ झाली आहे.
याचा नेपाळच्या समाज आणि राजकारणावर परिणाम होत आहे. नेपाळच्या 2021 च्या जनगणनेनुसार, ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या एकूण संख्येच्या 1.76 टक्के असून ती 5 लाख 12 हजार 313 आहे. ही संख्या प्रारंभी खूप वाटत नाही; मात्र त्याचा वाढीचा दर अधिक आहे. हे आश्चर्यकारक असण्याबरोबरच बदलत्या सामाजिक स्थितीचे चित्रही सांगणारे आहे.