Government Sensitivity | सरकारकडून संवेदनशीलतेचे दर्शन

अलीकडील घडामोडीत सरकारने जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता दाखवत लोककेंद्रित निर्णय घेतले आहेत. या कृतीमुळे प्रशासनाची सहानुभूतीपूर्वक भूमिका अधोरेखित झाली आहे.
Government Sensitivity
दिल्‍ली वार्तापत्र(Pudhari File Photo)
Published on
Updated on
उमेश कुमार

मोदी सरकारने 9 जून रोजीच हे संकेत दिले होते की, हा केवळ एक प्रतीकात्मक टप्पा नसून, एका संपूर्ण राजकीय आणि विकासात्मक प्रवासाचा उत्सव असेल. याच दिवशी भाजप मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या 11 वर्षांच्या कामगिरीचा तपशीलवार आढावा घेतला, तर 11 जून रोजी दिल्लीतील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपममध्ये सरकारच्या वतीने एका भव्य माध्यम संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते, ज्यात देशभरातील प्रमुख माध्यम संस्थांचे प्रतिनिधी, संपादक आणि पत्रकारांना आमंत्रित केले होते. तेथे केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या कामगिरीची माहिती दिली आणि भारताच्या विकासयात्रेला ‘विकासवाद विरुद्ध घराणेशाही’ या चर्चेत गुंफण्याचा प्रयत्न केला. तथापि, यामागेही सरकारच्या कामगिरीचा प्रचार करण्याचा हेतू स्पष्ट दिसत होता; पण या संवादात काही अशा गोष्टीही समोर आल्या, ज्यावरून काही मुद्द्यांवर सरकारमध्येही मतभेद असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय लाभ घेण्यावरून, ज्यात सरकारशी संबंधित एका ज्येष्ठ मंत्र्याने तर लष्करी मोहिमेचा राजकीय फायदा उचलू नये, असे म्हटले. दुसरीकडे सरकार आपल्या कामगिरीत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जोरदार प्रचार करत आहे.

भाजपच्या प्रचार मोहिमेदरम्यान हा अपघात झाला आणि त्याची द़ृश्ये तत्काळ सोशल मीडियावर व्हायरल झाली. यात आतापर्यंत 270 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लोकांनी हवाई सुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद आणि मूलभूत व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशावेळी सरकार व भाजपची आपल्या कामाची प्रचार मोहीम सुरू होती. पत्रकार आणि विरोधी पक्षनेत्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की, ही वेळ प्रचाराची होती की आत्मचिंतनाची? सरकार आणि पक्षाला याची जाणीव झाली की, या अपघातानंतरही जर तीच प्रचारशैली सुरू ठेवली, तर जनता याला असंवेदनशीलता म्हणून बघेल. त्यामुळे तत्काळ काही कार्यक्रम थांबवण्यात आले.

मंत्र्यांना सोशल मीडियावर ‘संतुलित भाषा’ वापरण्याचा सल्ला देण्यात आला. या संकटाच्या पार्श्वभूमीवर हेही उल्लेखनीय आहे की, भाजपची प्रचार मोहीम यावेळी केवळ तिसर्‍या कार्यकाळातील कामगिरीवर नव्हे, तर संपूर्ण 11 वर्षांच्या सातत्यावर आधारित होती. पक्षाला माहीत आहे की, तिसर्‍या कार्यकाळात आतापर्यंत असे मोठे निर्णय घेण्यात आलेले नाहीत, जे सामान्य जनतेला सहजपणे जाणवतील. याउलट सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील गेल्या 6 महिन्यांतच पाच मोठ्या घटनांचा सामना करावा लागला. यामध्ये सरकार बॅकफूटवर गेले आहे. त्यामुळे पक्षाने पहिल्या आणि दुसर्‍या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय घेतले ते म्हणजे, कलम 370 हटवणे, राम मंदिराची उभारणी, उज्ज्वला योजना, जी-20 नेतृत्व, डिजिटल व्यवहारांत भारताची आघाडीची भूमिका, कोरोना व्यवस्थापन आणि जागतिक स्तरावर भारताची पत यांना सध्याच्या कार्यकाळाशी जोडून एकाचवेळी सादर केले गेले. तसेच दहशतवादावर कठोर भूमिका घेण्याचा संदेशही दिला. दहशतवाद्यांच्या शत्रू देशातील तळावर हल्ला करून भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की, आता हे कदापि खपवून घेणार नाही.

Government Sensitivity
Pudhari Editorial : मुलींतील परिवर्तनशील शैक्षणिक जागरुकता

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीतीही याच प्रचार मोहिमेशी जोडलेली होती. नितीश कुमार यांच्या परत येण्यानंतर पक्षाने ‘स्थिरता विरुद्ध अराजकता’, ‘विकास विरुद्ध घराणेशाही’ यांसारख्या मूळ चर्चांना पुढे नेण्याचे ठरवले होते. 11 वर्षांच्या कामगिरीला याच निवडणूक रणनीतीचा ‘कॅम्पेन बॅकबोन’ म्हणून ठेवले होते. छोटे व्हिडीओ, लाभार्थी संवाद आणि योजनांचे लाभ आकडेवारीसह लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक सुसंघटित प्रक्रिया सुरू झाली होती; पण विमान अपघाताने अचानक संपूर्ण वातावरण बदलून टाकले. आता सरकारसमोर आव्हान आहे की, मध्येच थांबलेली प्रचार रणनीती पुन्हा कशी सुरू करावी? ती पुन्हा त्याच गतीने ‘11 वर्षे, 11 कमाल’ या घोषणांसह पुढे जाईल की एखादे नवीन सॉफ्ट नॅरेटिव्ह तयार करेल? याचे उत्तर कदाचित त्या धोरणात दडलेले आहे, जे भाजप सध्या अवलंबत आहे.

प्रचार तर सुरू राहील; पण त्यात मानवी संवेदना आणि संतुलनही जोडले जाईल. असे दिसून येत आहे की, मंत्री आता कामगिरीसोबतच हेही सांगत आहेत की, आम्ही केवळ आकडेवारी मोजत नाही, तर लोकांच्या जीवनात बदल घडवतो. हा भाषिक बदल प्रचारशैलीत आलेल्या संवेदनशीलतेला दर्शवतो. ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या संवेदनशील मुद्द्यांवर सरकार आणि पक्ष आता सावध झाले आहेत. सत्तेत सरकार कोणतेही असो, देशात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी घेत कोणत्याही प्रकारचे धोरण राबवणे हे चुकीचे असते. त्याचीच जाणीव घेत विद्यमान सरकारने संवेदनशीलता दाखवत नैतिकद़ृष्ट्या माघार घेतली असल्याचेच म्हणावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 9 जून 2025 रोजी केंद्रात 11 वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने भाजप आणि सरकार या दोन्ही स्तरांवर व्यापक प्रचार मोहीमही सुरू झाली होती. पक्षाने हा दिवस ‘सेवा, सुशासन आणि संकल्प’ची 11 वर्षे म्हणून सादर केला. सरकारच्या या उत्सवाला राजकीय संधीत रूपांतरित करण्याच्या रणनीतीवर कामही सुरू झाले होते; पण प्रचार ऐन भरात असतानाच अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण मोहिमेच्या वातावरणाला धक्का दिला. अपघाताची भीषण द़ृश्ये आणि उपस्थित झालेल्या प्रश्नांनी सरकारच्या उत्सवाला नैतिकद़ृष्ट्या अडचणीत आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news