Gen Z generation | जेन झेड पिढी..!

‘पिढ्यान् पिढ्या’ असे आपण म्हणतो तेव्हा त्यात असंख्य पिढ्यांचा समावेश असतो.
Gen Z Generation
जेन झेड पिढी..!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मंडळी तुम्हाला आज एक नवीन शब्दाचा अर्थ सांगणार आहोत. ‘पिढ्यान् पिढ्या’ असे आपण म्हणतो तेव्हा त्यात असंख्य पिढ्यांचा समावेश असतो. आपल्या आजोबांची पिढी असते, नंतर वडिलांची असते, आपली असते नंतर आपल्या मुलाबाळांची असते आणि त्याहीपुढे नातवंडांची असते. ‘जेन झेड’ म्हणजेच जनरेशन झेड नावाची एक पिढी तरुण आहे. 1996 ते 2010 च्या दरम्यान जन्मलेले लोक या जेन झेड पिढीचे सदस्य आहेत. सध्या या पिढीसाठी निघालेला ‘सैयारा’ नावाचा एक चित्रपट खूप गाजत आहे. थ्रिलर, सस्पेन्स, मारधाड या सर्वांवर मात करीत या चित्रपटाने एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे.

‘सैयारा’ हा निव्वळ चित्रपट राहिला नाही, तर तो या जेन झेड नावाच्या पिढीच्या आवडीनिवडीचे एक प्रमाणपत्र झाले आहे. हा चित्रपट पाहून हजारोंनी प्रेक्षक चित्रपटगृहात ओक्साबोक्षी रडत आहेत. ही पिढी अशी आहे, तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू कधीच येत नाहीत. एक प्रकारचा कोरडेपणा त्यांच्या वागण्यात असतो. अशा या पिढीला रडवण्याच्या बाबतीत दिग्दर्शक यशस्वी झाला आहे, हे मात्र निश्चित आहे.

Gen Z Generation
Pudhari Editorial : मुलींतील परिवर्तनशील शैक्षणिक जागरुकता

आपल्या आईच्या काळात बायका टीव्हीवर काही सीरियल बघून डोळ्याला पदर लावत असत. टीव्ही सीरीयलमधील दुःख पाहून काही महिला आजही रडत असतात. चित्रपटांचे अनुकरण समाज करत असतो. उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी आलेला ‘एक दुजे के लिए’ हा चित्रपट पाहून प्रेमिकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या नियमित यायच्या. ‘सैराट’ चित्रपट पाहून अनेक पंधरा-सोळा वर्षांच्या मुला-मुलींनी घरातून पळून जाऊन लग्न केल्याची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. ‘सैयारा’ चित्रपट पाहून मग रडतात ते कोण आहेत? हेच ते जेन झेडचे तरुण मुलं-मुली आहेत. प्रत्येक पिढीला एक कालातीत रोमँटिक सिनेमा लागतो. कोणाला राज कपूर-नर्गिस, देवानंद-नूतन, काहींना ‘कयामत से कयामत तक’ किंवा ‘आशिकी’ असे प्रकार लागतात. ‘सैयारा’ हा चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या भावनेला हात घालत आहे, हे निश्चित. ही एक हळुवार प्रेम कहाणी आहे. हा चित्रपट क्लासिक म्हणावा असा नाही; परंतु त्याची जाहिरात अशा पद्धतीने केली गेली की, तरुण प्रेक्षक चित्रपटगृहाकडे ओढला गेला.

Gen Z Generation
Editorial : लवंगी मिरची : निसर्ग प्रेरणा

आपल्यासारखे लोक एखाद्या चित्रपटाची खूप चर्चा झाली, तर लगेच उठून तिकीट काढून चित्रपटगृहात जात नाहीत. आपण तो सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्याची वाट पाहतो. यथावकाश महिनाभरात तो तसा आपल्या घरामधील टीव्हीवर पण पाहायला मिळतो. घरातील टीव्हीवर एकही रुपया खर्च न करता चित्रपट पाहणे नवीन पिढीला आवडत नाही. ही नवीन पिढी एक महिना दम काढायला तयार नसते आणि हेच खरे चित्रपटांचे प्रेक्षक असतात. पहिल्या दिवशी इतके कोटी, सातव्या दिवशी तितके कोटी असे करत करत ही कोटीची कोटी उड्डाणे या तरुण पिढीच्या जीवावरच मारलेली असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news