Engineers Day India | एकाच छताखालील शहर

भारतामध्ये नुकताच अभियंता दिन साजरा झाला. या पार्श्वभूमीवर जगभरातील अभियंत्यांनी साकारलेल्या अनेक अद्वितीय प्रकल्पांची सर्वत्र चर्चा झाली.
Engineers Day India
एकाच छताखालील शहर (Pudhari File Photo)
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

भारतामध्ये नुकताच अभियंता दिन साजरा झाला. या पार्श्वभूमीवर जगभरातील अभियंत्यांनी साकारलेल्या अनेक अद्वितीय प्रकल्पांची सर्वत्र चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विशेष चर्चेत आलेली एक वेगळी गोष्ट म्हणजे चीनमधील एकाच बिल्डिंगमध्ये संपूर्ण शहर ही आगळीवेगळी संकल्पना. या कल्पनेत माणसाच्या दैनंदिन जीवनातील जवळपास सर्व गरजा एका महाकाय इमारतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळेच चिनी अभियंत्यांनी साकारलेल्या या प्रकल्पांनी जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे. यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो चेंग्दू शहरातील न्यू सेंच्युरी ग्लोबल सेंटरचा. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक वापरासाठी खुले झालेले हे व्यापारी केंद्र जगातील सर्वात मोठ्या इमारतींपैकी एक मानले जाते. तिचे एकूण क्षेत्र 17 लाख चौरस मीटर आहे.

यामध्ये शॉपिंग मॉल, हॉटेल, कॉन्फरन्स हॉल, मनोरंजन केंद्र, आयएमएएक्स थिएटर, आयस्केटिंग रिंक तसेच कृत्रिम बीचसहित पाण्याचा थीम पार्क आहे. बाहेर न जाता एखाद्या छोट्या शहरात जशा सुविधा मिळतात तशा सुविधा या इमारतीत उपलब्ध आहेत. त्यामुळेच या इमारतीला एक शहर एका छताखाली अशी ओळख मिळाली आहे; मात्र येथे पर्यटनासाठी म्हणून येऊन फक्त काही काळासाठी लोक राहतात. ही इमारत रहिवाशी नसल्याने येथे स्थायी स्वरूपात नागरिक राहत नाहीत, हा या आगळ्यावेगळ्या शहरातील मुख्य फरक आहे. याउलट हांगझोऊतील रेजंट इंटरनॅशनल ही इमारत प्रत्यक्षात हजारो लोकांचे घर आहे. या अपार्टमेंट संकुलात 5 हजारांहून अधिक घरं असून साधारण 11 ते 20 हजार लोक राहतात, असा अंदाज आहे. काही अहवालांनुसार या इमारतीची क्षमता यापेक्षाही जास्त आहे. या इमारतीत सुपर मार्केट, फूडकोर्ट, जिम, ब्युटी सलून, दैनंदिन गरजांची दुकाने अशा सर्व सोयी-सुविधा आहेत. त्यामुळे येथे राहणार्‍या लोकांना बहुतांश कामांसाठी बाहेर जावे लागत नाही. प्रत्यक्षात ही इमारत एका छोट्या शहरासारखी कार्य करते.

Engineers Day India
World Watch | ट्रम्प यांच्या रूपाने जपानमध्ये कामिया यांचा उदय

याशिवाय चोंगकिंग शहराला व्हर्टिकल सिटी म्हणून ओळख मिळाली आहे. संपूर्ण शहर थरांवर उभे असल्यामुळे ते एकाच विशाल रचनेसारखे भासतं. अशा संकल्पनांचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. फायदे म्हणजे वाहतुकीवर नियंत्रण, सेवांचे केंद्रीकरण आणि सोयीसुविधांची जवळीक; परंतु बंदिस्त वातावरण, मानसिक आरोग्याचे प्रश्न, सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन हे तोटेही तितकेच महत्त्वाचे ठरतात. एकूणच पाहता, चीनमधील या महाकाय इमारती आधुनिक शहरी जीवनशैलीच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत. कुठे व्यावसायिक आणि मनोरंजनाचे केंद्र, तर कुठे प्रत्यक्ष राहणार्‍यांचे सूक्ष्म-शहर. एकाच बिल्डिंगमध्ये संपूर्ण शहर ही संकल्पना सध्या जगाला अनोखी आणि आश्चर्यकारक वाटते; पण कदाचित भविष्यात अशी बांधकामं जागतिक शहरीकरणाचा एक नवा मार्ग ठरू शकतील, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news