Bot farms & Digital warfare | बॉट फार्म्स आणि डिजिटल युद्ध

Bot farms & Digital warfare |
Bot farms & Digital warfare | बॉट फार्म्स आणि डिजिटल युद्ध
Published on
Updated on

अक्षय निर्मळे

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पाकिस्तानातून चालवल्या जाणार्‍या ‘बॉट फार्म्स’मधून अमेरिकेत इस्रायलविरोधी वातावरण कृत्रिमरीत्या तयार केले जात असल्याचा आरोप केला. मोसाद सारखी जगातली टॉपची गुप्तहेर संघटना असलेल्या देशाचा प्रमुख हे बोलत असल्याने ते गांभीर्याने घ्यावे लागते. जर पाकिस्तान अमेरिकेत हे करू शकत असेल तर भविष्यात भारतासाठीही ते धोकादायकच आहे.

एकूणच नव्या युद्धपद्धतीत हे ‘बॉट फार्म्स’ लोकशाही व्यवस्थांसाठी गंभीर आव्हान ठरत आहेत. बॉट फार्म म्हणजे रोबोटस्चे नेटवर्क, ज्याद्वारे काही सेकंदांत हजारो पोस्टस्, लाईक्स किंवा कमेंटस् केल्या जातात. ऑनलाईन चर्चांवर कृत्रिम प्रभाव टाकण्यासाठी, प्रोपगंडा, ट्रेंडस् निर्माण करणे, एखाद्या मताला मोठे लोकसमर्थन असल्याचा आभास निर्माण करणे इ.साठी याचा वापर होतो. हे इतके नियोजनबद्ध घडते की, सामान्य युजरला ते कृत्रिम आहे हे ओळखता येत नाही.

यातून एखाद्या सोशल मीडिया पोस्टची लोकप्रियता कृत्रिमरीत्या वाढवली जाते. यामागचा उद्देश सोशल मीडिया अल्गोरिदमला एखादा विषय खूप लोकप्रिय आहे असा भासवणे हा असतो. एकाच वेळी हजारो खात्यांतून समान संदेश, व्हिडीओ किंवा हॅशटॅग पसरवले जातात आणि काही तासांत तो विषय ‘ट्रेंड’ होऊ लागतो. लोकशाहीतील सार्वजनिक मतमतांतरे जिथे मुक्त चर्चांवर उभी असतात, तिथे अशा कृत्रिम प्रचारयंत्रणा लोकमताचा कणा कमकुवत करतात. ट्रोल म्हणजे प्रत्यक्ष व्यक्ती, जी मुद्दाम वाद निर्माण करणार्‍या किंवा दिशाभूल करणार्‍या पोस्टस् करते; तर बॉट फार्म हे मोठ्या प्रमाणावर चालवलेले खोट्या अकाऊंटस्चे नेटवर्क असते. यातील सर्वांत धोकादायक पैलू म्हणजे एआयचा वाढता वापर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news