AI Health Scanning | एआय आरशात दिसेल तब्येतीचे स्कॅनिंग

गेल्या काही वर्षांत लोकांचा फिटनेस आणि आरोग्याकडे बघण्याचा द़ृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.
AI Health Scanning
एआय आरशात दिसेल तब्येतीचे स्कॅनिंग (Pudhari File Photo)
Published on
Updated on

आशीष शिंदे

गेल्या काही वर्षांत लोकांचा फिटनेस आणि आरोग्याकडे बघण्याचा द़ृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. दररोज व्यायाम करणे, फिट राहणे हा तर जणू एक ट्रेंडच बनला आहे. मग काय प्रत्येकजण स्मार्ट वॉच, फिटनेस बँड, मोबाईल अ‍ॅप्स यांच्या मदतीने आपण दररोज किती पावले चाललो, हृदयाचे ठोके किती झाले, झोप किती तास घेतली याचा हिशेब ठेवताना आपल्याला दिसतो. पण सध्याच्या गॅजेट वर्ल्डमध्ये या सगळ्यांच्या पुढे एक कल्पनेपडलीकडील भन्नाट गॅजेट आले आहे.

जे फक्त आकडेवारी दाखवत नाही, तर तुमच्या आरोग्याची अगदी आरशासारखी खरी प्रतिमा समोर ठेवते. फिटनेस ट्रॅकर मिरर समोर तुम्ही उभा राहिला की, अगदी एखाद्या हॉलीवूडच्या चित्रपटातील हायटेक गॅजेट प्रमाणे हा तुमचे संपूर्ण शरीर स्कॅन करतो आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तुमच्या शरीरातील बदलाची संपूर्ण माहिती हा आरसा तुम्हाला दाखवतो.

दिसायला हा अगदी घरातील साधा आरसा वाटतो. पण त्यात लपलेली टेक्नॉलॉजी पाहून तुम्ही थक्क होणार. त्याच्यासमोर खास डिझाईन केलेल्या बेसवर उभे राहिलात की तो तुमच्या शरीराचे स्कॅनिंग सुरू करतो. एआय आणि सेन्सर्सच्या मदतीने तो हृदयाचे स्वास्थ्य, मेटाबॉलिक रचना, शरीरातील चरबी, स्नायू, पाणी यांचे प्रमाण मोजतो आणि त्यावर आधारित तुमच्यासाठी एकूण हेल्थ स्कोअर तयार करतो. म्हणजे आरशात तुम्हाला फक्त चेहरा नाही, तर आरोग्याचे खरे रूप दिसते. या स्मार्ट आरशामध्ये अनेक भन्नाट फिचर्स आहेत. तो हृदयाचे ठोके मोजतो, शरीरातील फॅट आणि स्नायूंचा बॅलन्स दाखवतो, अगदी मेटाबॉलिझम किती योग्य चालले आहे हेही सांगतो. यातील सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे एआयवर आधारित हेल्थ इम्प्रूव्हमेंट स्कोअर. हा स्कोअर तुमच्या एकूण आरोग्याची पातळी दाखवतो आणि वेळोवेळी तो सुधारण्यासाठी सूचना करतो.

याशिवाय या स्मार्ट आरशाच्या कंपनीचे इतर वेअरेबल्स, जसे की स्मार्ट वॉच किंवा फिटनेस बँड त्याच्याशी कनेक्ट होतात. त्यामुळे तुम्ही किती चाललात, किती झोपलात, हृदयाचे ठोके किती झाले याचा डेटा थेट या आरशात आणि मोबाईल अ‍ॅपमध्ये मिळतो. या स्मार्ट आरशाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संवाद साधणे.

AI Health Scanning
Editorial : जी-20 आणि भारतीय शेती

तो फक्त डेटा दाखवत नाही तर तुमच्या सवयी ओळखतो, वेळोवेळी सूचना करतो आणि आरोग्यविषयक प्रगतीबद्दल प्रोत्साहन देतो. कधी मेहनतीचे कौतुक करणारा, तर कधी आळशीपणावर टोमणाही मारणारा हा डिजिटल साथीदार आहे.

AI Health Scanning
Pudhari Editorial : चिमणी भुर्रर्र उडाली!

याची वापरायची पद्धतही अगदी सोपी आहे. समोर उभे राहिले की स्कॅनिंग सुरू होते आणि काही मिनिटांत तुम्हाला तुमच्या आरोग्याचे संपूर्ण चित्र आरशात असणार्‍या स्क्रीनवर दिसते. स्कॅन पूर्ण झाल्यावर एआय अल्गोरिदम तो डेटा प्रोसेस करून अ‍ॅपमध्ये जतन करतो. त्यानंतर अ‍ॅप तुम्हाला चार्ट, सल्ले, पुढील फिटनेस गोल्स आणि सुधारण्याचे मार्ग सुचवते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news