आव्हाने आणि संधींचा काळ

आव्हाने आणि संधींचा काळ

मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे आगमन झाले आहे. भूतकाळातील घडामोडींवर विचार करण्याबरोबरच जगाने प्रामुख्याने भारताने भविष्यकाळात असणार्‍या अपेक्षांबाबत विचार करावयास लावणारा हा काळ आहे. यावर्षी मोठी लोकसंख्या असणार्‍या सात देशांसह 40 पेक्षा अधिक देशांत सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि त्यात कदाचित नेतृत्वात महत्त्वाचे बदल होऊ शकतात.

फ्रान्सचे भविष्यवेत्ते आणि ज्योतिषी नास्रोडॅमस यांनी पाचशे वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी करत 2024 मध्ये हवामान बदलामुळे महापूर येईल, असे सांगितले. त्यांनी आर्थिक, पर्यावरण, राजकीय आणि सामाजिक आघाडीवरही महत्त्वाचे बदल होण्याचेही भाकीत केले. त्यांनी चीनशी संघर्ष आणि मध्यपूर्वमध्ये युद्ध भडकण्याचीही भविष्यवाणी केली. तसेच व्हॅटिकनमध्ये नवीन पोप आणि बि—टनमध्ये एक नवीन राजा असेल, असेही सांगितले. नवीन वर्षाच्या प्रारंभी भूतकाळातील घडामोडींवर विचार करण्याबरोबरच जगाने प्रामुख्याने भारताने भविष्यकाळात असणार्‍या अपेक्षांबाबत विचार करावयास लावणारा हा काळ आहे. यावर्षी मोठी लोकसंख्या असणार्‍या सात देशांसह 40 पेक्षा अधिक देशांत सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि त्यात कदाचित नेतृत्वात महत्त्वाचे बदल होऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात समोरासमोर होणारा राजकीय संघर्ष हा जगातील मोठ्या घटनांपैकी एक असू शकतो. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाचवा कार्यकाळ हवा आहे. युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की पुन्हा निवडणूक लढवू शकतात, तर त्याचवेळी मेक्सिकोच्या अध्यक्षपदासाठी दोन महिला मैदानात आहेत. 2024 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट या काळात पॅरिसमध्ये होत आहेत. उद्घाटन सोहळा हा एखाद्या स्टेडियममध्ये आयोजित करण्याऐवजी सीन नदीत अ‍ॅथलिटस्ना घेऊन जाणार्‍या नौकेत होत आहे. राजे चार्ल्स (तिसरे) यांचे छायाचित्र असलेली नोट लवकरच बाजारात येईल. नेदरलँडच्या शाळेत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. भाजपने दिलेल्या आश्वासनानुसार अयोध्येत राम मंदिराचे अनावरण नव्या वर्षात होत आहे. काश्मीरमधील कलम 370 हटविले असून, आता सरकारचे लक्ष समान नागरी कायदा (यूसीसी) वर असून, त्यावर सर्वांची संमती मिळवण्याचा प्रयत्न असेल.

2024 ची लोकसभा निवडणूक मोदी यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची असणार आहे. त्याचा निकाल काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर परिणाम करेल आणि विरोधकांच्या आघाडीचीदेखील परीक्षा होणार आहे. दरम्यानच्या काळात भाजपला दक्षिणेत पाठबळ मिळवणे आणि उत्तर भारतात आपले महत्त्व कायम राखण्याची संधी मिळणार आहे. यावर्षी जम्मू काश्मीरसह आठ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अलीकडच्या निवडणूक निकालावर विरोधी पक्ष असमाधानी आहेत. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी ऐक्य दाखवत भाजपचे बलस्थान, नेतृत्व आणि संघटनेचा एकत्रित मुकाबला करण्याची तयारी केली आहे. आर्थिक क्षेत्राकडे पाहिल्यास चालू वर्षी अमेरिकी अर्थव्यवस्था 2023 मध्ये 2.4 टक्के, तर 2024 मध्ये 1.2 टक्के एवढ्या मंद गतीने वाढण्याची अपेक्षा आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास 2024 मध्ये तो 6.3 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे देशात लवचिकपणा राहील आणि बाह्य संकटांचा फारसा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार नाही आणि म्हणूनच सलग तिसर्‍या वर्षात जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत नावारूपास येईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजानुसार 2023 आणि 2024 मध्ये भारताचा विकास दर 6 टक्क्यांपेक्षा अधिक राहील आणि तो चीनच्या 4.5 टक्के विकास दरापेक्षा अधिक राहील. 2030-31 पर्यंत भारताचा जीडीपी 6.7 ट्रिलियन डॉलर होण्याची आशा आहे आणि म्हणून अमेरिका आणि चीननंतर भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकाची होऊ शकते. शिक्षण, आरोग्यसेवा, आयटी आणि पीएलआय, उद्योगात उल्लेखनीय वाढ होऊ शकते. त्याचवेळी भारताला राजकीय अस्थिरता, महागाई, कौशल्याचा अभाव, सायबर हल्ले, हवामान बदल आणि बदलती जीवनशैली यासारख्या आव्हानांचा विचार करावा येईल. जागतिक शक्ती आणि ग्लोबल साऊथच्या नेतृत्वाच्या रूपाने पाहताना भारताच्या स्थितीची प्रचिती जी-20 च्या शिखर संमेलनात दिसून आली. पुढची जी-20 परिषद रिओ द जानिरो येथे होत आहे. नवी दिल्लीत जानेवारीत होणारे 'क्वाड' नेत्यांचे शिखर संमेलन स्थगित करण्यात आले असून, ते आता 2024 नंतर होणार आहे. चौगमची बैठकदेखील 2024 मध्ये होणार आहे. मोदी यांची नेबरहूड फर्स्टची रणनीती प्रादेशिक शांतता आणि विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढविण्याच्या धोरणावर काम करत आहे.

भारत पश्चिम देशांसमवेत संरक्षण संदर्भात विस्तार करू इच्छित आहे. युक्रेन युद्धाबाबत भारत तटस्थ राहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल-हमास संघर्षाबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला आहे आणि त्याच्याकडे व्यापक प्रमाणात मनुष्यबळ आणि उच्च आर्थिक विकास होऊ शकतो. चांगला आर्थिक विकास दर गाठण्यासाठी भारताने सध्याच्या संधीचा लाभ घ्यायला हवा. 2024 मध्ये आपल्याला आव्हाने आणि संधी या समान पातळीने मुकाबला करावा लागणार आहे. या आव्हानांचा सामना करत संधीचा अधिकाधिक लाभ उचलण्याचे धाडस दाखविण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news