लवंगी मिरची : केवळ अद्भुत..!

लवंगी मिरची : केवळ अद्भुत..!

मित्रा, आपल्या भारत देशाने यावर्षी सर्वच दिशांना सीमोल्लंघन केले आहे. हे गगनयान कशासाठी पाठवले आहे, मला जरा सोपे करून सांगशील का?

हे बघ आपण चांद्रयान पाठवले ते चंद्रावर गेले. त्याच्या लँडरने नेमून दिलेली सगळी कामं केली आणि चौदा दिवसांनंतर ते शांततेने झोपी गेले. कदाचित ते जागे होऊन पुन्हा कामाला लागेल अशी शक्यता आहे. पण, जरी ते जागे झाले नाही, तरी त्याला नेमून दिलेले काम त्याने पूर्ण केलेले आहे.

त्यानंतर आपले दुसरे यान म्हणजे आदित्ययान. हे चक्क सूर्याच्या दिशेने प्रवास करत आहे. आदित्य म्हणजे सूर्य आणि त्याच्या दिशेने झेपावलेले यान म्हणजे आदित्ययान. या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात आपण आणखी एक मोहीम आखली आणि ती म्हणजे गगनयान. आता गगनयान म्हणजे अंतराळात कमी अंतरावर जाणारे एक प्रकारचे विमान समज. म्हणजे बघ आपण हे गगनयान पृथ्वीपासून केवळ 400 किलोमीटर अंतरावर पाठवले आहे हे लक्षात घे. हे यान कुठेही थांबणार नाहीये किंवा याला कुठलाही स्टॉप नाहीये. चारशे किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर याच्यामधून एक काचेची कॅप्सूल बाहेर आली. कॅप्सूल म्हणजे बंद पेटी. ही कॅप्सूल तीन दिवस अंतराळात फिरत राहील आणि नंतर गगनयान त्या कॅप्सूलला घेऊन परत पृथ्वीवर येणार आहे.

अरे सांगतोस काय?म्हणजे डोक्याचा भूगा होईल विचार करून करून, असं काहीतरी अद्भुत आणि अतर्क्य आपल्या देशाने करून दाखवले आहे. आता मला एक सांग ही काचेची बंद पेटी किंवा जी कॅप्सूल तू म्हणत आहेस ही आपण कशासाठी सोडलेली आहे?.

हे बघ ही अंतराळात माणसे पाठवण्याची तयारी सुरू आहे. हे एक वेगळ्या प्रकारचे सीमोल्लंघन म्हणता येईल. म्हणजे बघ 2025 मध्ये आपण या कॅप्सूलमधून तीन व्यक्ती पाठवणार आहोत आणि या तीन व्यक्ती अंतराळात फिरून तीन दिवसांनंतर पुन्हा परत आपल्याकडे येणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून आपण हे गगनयान पाठवले आहे.

म्हणजे अंतराळात ते पडणार नाही का?

अजिबात नाही. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. आपले जाणारे अंतराळवीर हे त्या निर्वात पोकळीमध्ये सोबत घेऊन जाणार्‍या एनर्जीच्या मदतीने चालणार आहेत. म्हणजे अंतराळामध्ये जर एखाद्या अंतराळवीराने एक पाऊल टाकले तर तो 14 फूट उंच जातो कारण तिथे गुरुत्वाकर्षण नाही.

तुझे हे जे सांगत आहेस ना मित्रा, त्याच्याने माझ्या डोक्यात अगदी चकरा येत आहेत. म्हणजे अवकाशाच्या सीमा पार करून गौरवपूर्ण अशी गोष्ट आपण करणार आहोत.

अरे हे अचानक ठरत नसते. याची तयारी तीन ते चार वर्षे आधीच केली जाते. तुला आणखी एक आश्चर्याचा धक्का देणार आहे. सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरू आहे. आई जगदंबेची अनेक रूपे आपण पहिली. 2025 मध्ये गगनयान मोहिमेत अंतराळात कदाचित तीनही महिला शास्त्रज्ञ किंवा किमान एक तरी महिला अंतराळवीर असावी, असे आपले नियोजन सुरू आहे.

अरे काय सांगतोस काय? हे म्हणजे चक्क दुर्गेचे सीमोल्लंघन असणार आहे तर. अचाट आणि अफाट बुद्धिमत्ता असलेला आपला देश तारांगणात चमकणार आहे तर. चल, सोने लुटुयात आणि खर्‍या अर्थाने सीमोल्लंघन करूयात. हॅप्पी दसरा मित्रा. सर्वांना दसरा सुख आणि समृद्धीचा जावो ही अपेक्षा!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news