लवंगी मिरची : चायनाचा फुगा फुटला!

लवंगी मिरची : चायनाचा फुगा फुटला!
Published on
Updated on

जगन : अरे मगन, तू ती बातमी वाचलीस का? चायनाचा एक भला मोठा फुगा, म्हणजे बलून अमेरिकेच्या डोक्यावरून चालला होता म्हणे. अमेरिकेने काही तरी क्षेपणास्त्र डागून तो फुगा उडवला म्हणे. काय असेल रे हे प्रकरण?

मगन : हे बघ, चायनाच्या वस्तूंचे काही सांगता येत नाही. कोणतीही चायनीज वस्तू घे, तिच्याविषयी लोक काय म्हणतात माहितीये का? 'चला तो चाँद तक, ना चला तो शाम तक.' म्हणजे त्यांची वस्तू अनंत काळापर्यंत सक्रिय राहू शकते किंवा संध्याकाळीही बंद पडू शकते. आता हा तर जाणूनबुजून फुगाच होता. त्याला पाठवायचे असेल चंद्रावर आणि आला असेल भरकटत अमेरिकेच्या डोक्यावर.

जगन : तसं नाही रे. काही तरी हेरगिरी करण्यासाठी सोडला होता म्हणे चायनाने, म्हणजे चीनने. अमेरिकेला त्यांचा कावा लक्षात आला आणि अमेरिकेने तो फोडून चायनाचा कट उधळून लावला.

मगन : हा, हे मात्र खरे की, या बारीक डोळ्याच्या चिनी लोकांचं काही सांगता येत नाही. महाभयंकर कुटिल कारस्थानी असतात ते. आपल्या भारताच्या सीमेवरही सारख्या काही तरी कुरापती करत असतात;

जगन : न पटण्यासारखं काय आहे त्यात? चायना सगळा माल डुप्लिकेट तयार करते. तसेच काही तरी हा बलून तयार करायला गेले असतील जगभर विकायचा म्हणून. हा उडाला असेल आणि फिरत फिरत गेला असेल अमेरिकेत. चायनाच्या फटाक्यांचेही काही सांगता येत नाही. चायनाच्या वस्तूंचं काही खरं नाही. खरं म्हणजे सध्या तर चायनाचंच काही खरं नाही.

मगन : असेल तसे असेल, म्हणजे शक्य आहे; पण चायनावरचे जोक प्रसिद्ध आहेत. मागे एकदा त्यांचे अध्यक्ष आले होते. ते नाही का रे साबरमतीच्या काठावर आपण झोक्यावर बसवले होते त्यांना. टी.व्ही. पाहताना माझा चौथीत जाणार्‍या मुलाने मला विचारले, हे कोण आहेत? मी म्हणालो, चायनाचे प्रेसिडेंट आहेत. तर तो म्हणतो कसा, मग ओरिजनल कुठे आहेत? म्हणजे चायनाचं काहीच ओरिजनल नाही, टिकाऊ नाही, दमदार नाही याविषयी जगभरात कोणालाही आता शंका राहिलेली नाही. त्यामुळे अमेरिकेने चायनाचा फुगा एवढा सीरियसली घ्यायला नको होता. अमेरिकेच्या वरून पुन्हा जगभर फिरून कदाचित तो पुन्हा चीनला परत गेला असता; पण अमेरिकन लोकांना घाईच फार. उचललं मिसाईल आणि फोडला फुगा.

जगन : बर, मला एक सांग, त्यांच्या बारीक डोळ्यांमधून म्हणजे खाचाच असतात रे त्या, त्यांना पूर्ण चित्र दिसत असेल का समोरचे? जसे आपल्याला दिसते तसे?

मगन : अरे, त्या लोकांच्या डोळ्यांची ठेवणच तशी असते. त्यांचे डोळे बारीक असतात; पण डोळ्यांच्या बाहुल्या आपल्यासारख्याच असतात. त्यामुळे आपल्याला जसे दिसते तसेच त्यांना दिसते. मीही तसा बारीक डोळे करून बघायचा प्रयत्न केला, तर मलाही सगळ्या वस्तू लहान दिसू लागल्या; पण त्यांना त्या बरोबर दिसतात. मला कमाल वाटते त्या लोकांच्या वस्तू तयार करण्याची आणि त्याही अत्यंत स्वस्त तयार करण्याची.

जगन : अरे, फ—ेमच काय म्हणतोस? दिवाळीतल्या लाईटच्या माळा घे, इलेक्ट्रिकचे कोणतेही सामान घे, लहान मुलांची खेळणी घे, पतंग घे, पतंगाचा मांजा घे, भारतीय बाजारात उपलब्ध असणारी प्रत्येक वस्तू आज चीनमध्ये तयार होते आणि आपल्याकडे विकली जाते. फक्त भारतातच नाही, तर चायनीज वस्तूंनी जगातसुद्धा धुमाकूळ घातला आहे आणि या इकॉनॉमीच्या जोरावर चायना सर्वत्र दादागिरी करत असतो. आपल्याकडे बर्‍याच लोकांनी चायनाच्या वस्तूंवर बहिष्कार घातला; पण आपण वापरतो त्या मोबाईलचे कित्येक पार्ट चायनामध्ये तयार होतात.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news