लवंगी मिरची : वाचन मळमळ | पुढारी

लवंगी मिरची : वाचन मळमळ

सोने, बाहेर चाललीयेस? मग माझं एवढं लायब्ररीचं मासिक बदलून आणशील?
नको बाबा.ते काम तेवढं तुमचं तुम्हीच करा.
एरवी एवढी बाहेर भटकतेस, मग वाचनालयाचं छोटंसंही काम करायला जीव का काढतेस बये?
आम्ही लहानपणी लायब्ररीत जायला धडपडायचो, माहितीये? तुम्हाला आताच्या मुलांना वाचनाचं प्रेमच नाही.
तसं म्हणा. आताची मुलं कुचकामी, असं मधूनमधून म्हणायला आवडतंच तुम्हाला!
ही नुसती शेरेबाजी नसते बरं आमची. आमच्या लहानपणी वाचनालयांना ज्ञानमंदिरं मानायचे. तेथे जाऊन खरं म्हणजे माणसाला प्रेरणा, स्फूर्ती वगैरे यायला पाहिजे. तर तुझं आपलं तिसरंच!

सध्याची तुमची लायबऽलवंगी मिरची : वाचन मळमळ

सध्याची तुमची लायब्ररी डोळ्यांपुढे आणा बाबा. ही सगळी वाक्यं मागे घ्याल. किती कळकट आहे ती जागा, कसलं उदासवाणं वातावरण आहे तिथे, खूपदा धड लखलखीत उजेडसुद्धा नसतो.
उगाच दिवे जाळून वीजबिलं वाढवणं परवडत नाही अशा संस्थांना. तुमचं नावं ठेवणार्‍यांचं काय जातंय?
चला. मानलं एकवेळ, अंधार तर अंधार. पण चांगले धट्टेकट्टे, हसतमुख कर्मचारी तरी असावेत ना तिथे! तेही नाही. जांभया देत बसलेले, त्रासिक चेहर्‍याने वावरणारे असले स्टाफ मेंबर्स असतात तुमच्या ज्ञानमंदिरात.

संबंधित बातम्या

वाचनालयांपाशी पैसा नसतो पोरी. तिथल्या कामाचे तास खूप; पण पगार कमी, त्यामुळे तसे दुर्बल लोकच इथल्या नोकर्‍या पत्करतात. पुढे वर्षांनुवर्षे त्याच तोकड्या पैशात, तेवढंच काम करत राहतात.
हे सगळं तुम्हाला कळतंय ना बाबा? तरी मला आग्रह का करता तिथे जाण्याचा?
पुस्तकं बघणं, हाताळणं, चाळणं ह्यातूनही खूप शिकायला मिळतं गं. कोरोना काळात वाचनालयं उघडत नसत, तेव्हा किती चुकल्यासारखं व्हायचं मला. कोरोना गेला; पण वाचनालयांची सगळी कळाच संपवून गेला जसा काही!
कोरोनामुळे असं इतरही खूप उद्योगांचं झालंय बाबा; पण ते आता कात टाकताहेत, लोक नव्या जोमाने जुन्या बुडीत उद्योगांना भिडले आहेत. तसं पुस्तकांचं, वाचनालयांचं का होत नाहीये बाबा?
वाचन चळवळ वाढावी, तिने जोम धरावा, असं खूप बोललं जातंय बरं का!
फक्त बोललंच जातंय ना? त्यावर काही खास अ‍ॅक्शन घेतली जातेय का?
जातेय, म्हणजे जात असावी, म्हणजे जायला हवीच आहे ह्यावर सगळे ठाम आहेत.

नुसते मनात ठाम असून काही उपयोग नाही बाबा. आधीच मोबाईलने, इंटरनेटने पुस्तकांवर संक्रांत आणलीये. त्यात कोरोनाची भर. गावात पुस्तकांची फारशी दुकानं नाहीत, जी आहेत ती पुस्तकं विकण्यापेक्षा ऑडिओ व्हिडीओ कंटेंट विकण्यात गर्क! नावापुरती म्हणायला थोडीफार वाचनालयं आहेत; पण त्यांची कळा गेलेली, अशाने वाचनाविषयी मळमळच वाटायची लोकांना. वाचन चळवळ थोडीच वाढणार आहे? वाचनाविषयी खरी तळमळ असेल तर पुस्तकांची दुकानं आणि वाचनालयं वाढवा, सुधारा म्हणावं. तरच आम्ही लोक उत्साहाने वाचनाकडे वळू.लवंगी मिरची : वाचन मळमळ
सोने, बाहेर चाललीयेस? मग माझं एवढं लायब्ररीचं मासिक बदलून आणशील?
नको बाबा.ते काम तेवढं तुमचं तुम्हीच करा.

एरवी एवढी बाहेर भटकतेस, मग वाचनालयाचं छोटंसंही काम करायला जीव का काढतेस बये?
आम्ही लहानपणी लायब्ररीत जायला धडपडायचो, माहितीये? तुम्हाला आताच्या मुलांना वाचनाचं प्रेमच नाही.
तसं म्हणा. आताची मुलं कुचकामी, असं मधूनमधून म्हणायला आवडतंच तुम्हाला!
ही नुसती शेरेबाजी नसते बरं आमची. आमच्या लहानपणी वाचनालयांना ज्ञानमंदिरं मानायचे. तेथे जाऊन खरं म्हणजे माणसाला प्रेरणा, स्फूर्ती वगैरे यायला पाहिजे. तर तुझं आपलं तिसरंच!
सध्याची तुमची लायब्ररी डोळ्यांपुढे आणा बाबा. ही सगळी वाक्यं मागे घ्याल. किती कळकट आहे ती जागा, कसलं उदासवाणं वातावरण आहे तिथे, खूपदा धड लखलखीत उजेडसुद्धा नसतो.
उगाच दिवे जाळून वीजबिलं वाढवणं परवडत नाही अशा संस्थांना. तुमचं नावं ठेवणार्‍यांचं काय जातंय?
चला. मानलं एकवेळ, अंधार तर अंधार. पण चांगले धट्टेकट्टे, हसतमुख कर्मचारी तरी असावेत ना तिथे! तेही नाही. जांभया देत बसलेले, त्रासिक चेहर्‍याने वावरणारे असले स्टाफ मेंबर्स असतात तुमच्या ज्ञानमंदिरात.

वाचनालयांपाशी पैसा नसतो पोरी. तिथल्या कामाचे तास खूप; पण पगार कमी, त्यामुळे तसे दुर्बल लोकच इथल्या नोकर्‍या पत्करतात. पुढे वर्षांनुवर्षे त्याच तोकड्या पैशात, तेवढंच काम करत राहतात.
हे सगळं तुम्हाला कळतंय ना बाबा? तरी मला आग्रह का करता तिथे जाण्याचा?
पुस्तकं बघणं, हाताळणं, चाळणं ह्यातूनही खूप शिकायला मिळतं गं. कोरोना काळात वाचनालयं उघडत नसत, तेव्हा किती चुकल्यासारखं व्हायचं मला. कोरोना गेला; पण वाचनालयांची सगळी कळाच संपवून गेला जसा काही!
कोरोनामुळे असं इतरही खूप उद्योगांचं झालंय बाबा; पण ते आता कात टाकताहेत, लोक नव्या जोमाने जुन्या बुडीत उद्योगांना भिडले आहेत. तसं पुस्तकांचं, वाचनालयांचं का होत नाहीये बाबा?
वाचन चळवळ वाढावी, तिने जोम धरावा, असं खूप बोललं जातंय बरं का!
फक्त बोललंच जातंय ना? त्यावर काही खास अ‍ॅक्शन घेतली जातेय का?
जातेय, म्हणजे जात असावी, म्हणजे जायला हवीच आहे ह्यावर सगळे ठाम आहेत.

नुसते मनात ठाम असून काही उपयोग नाही बाबा. आधीच मोबाईलने, इंटरनेटने पुस्तकांवर संक्रांत आणलीये. त्यात कोरोनाची भर. गावात पुस्तकांची फारशी दुकानं नाहीत, जी आहेत ती पुस्तकं विकण्यापेक्षा ऑडिओ व्हिडीओ कंटेंट विकण्यात गर्क! नावापुरती म्हणायला थोडीफार वाचनालयं आहेत; पण त्यांची कळा गेलेली, अशाने वाचनाविषयी मळमळच वाटायची लोकांना. वाचन चळवळ थोडीच वाढणार आहे? वाचनाविषयी खरी तळमळ असेल तर पुस्तकांची दुकानं आणि वाचनालयं वाढवा, सुधारा म्हणावं. तरच आम्ही लोक उत्साहाने वाचनाकडे वळू.—री डोळ्यांपुढे आणा बाबा. ही सगळी वाक्यं मागे घ्याल. किती कळकट आहे ती जागा, कसलं उदासवाणं वातावरण आहे तिथे, खूपदा धड लखलखीत उजेडसुद्धा नसतो.
उगाच दिवे जाळून वीजबिलं वाढवणं परवडत नाही अशा संस्थांना. तुमचं नावं ठेवणार्‍यांचं काय जातंय?
चला. मानलं एकवेळ, अंधार तर अंधार. पण चांगले धट्टेकट्टे, हसतमुख कर्मचारी तरी असावेत ना तिथे! तेही नाही. जांभया देत बसलेले, त्रासिक चेहर्‍याने वावरणारे असले स्टाफ मेंबर्स असतात तुमच्या ज्ञानमंदिरात.

वाचनालयांपाशी पैसा नसतो पोरी. तिथल्या कामाचे तास खूप; पण पगार कमी, त्यामुळे तसे दुर्बल लोकच इथल्या नोकर्‍या पत्करतात. पुढे वर्षांनुवर्षे त्याच तोकड्या पैशात, तेवढंच काम करत राहतात.
हे सगळं तुम्हाला कळतंय ना बाबा? तरी मला आग्रह का करता तिथे जाण्याचा?
पुस्तकं बघणं, हाताळणं, चाळणं ह्यातूनही खूप शिकायला मिळतं गं. कोरोना काळात वाचनालयं उघडत नसत, तेव्हा किती चुकल्यासारखं व्हायचं मला. कोरोना गेला; पण वाचनालयांची सगळी कळाच संपवून गेला जसा काही!

कोरोनामुळे असं इतरही खूप उद्योगांचं झालंय बाबा; पण ते आता कात टाकताहेत, लोक नव्या जोमाने जुन्या बुडीत उद्योगांना भिडले आहेत. तसं पुस्तकांचं, वाचनालयांचं का होत नाहीये बाबा?
वाचन चळवळ वाढावी, तिने जोम धरावा, असं खूप बोललं जातंय बरं का!
फक्त बोललंच जातंय ना? त्यावर काही खास अ‍ॅक्शन घेतली जातेय का?
जातेय, म्हणजे जात असावी, म्हणजे जायला हवीच आहे ह्यावर सगळे ठाम आहेत.

नुसते मनात ठाम असून काही उपयोग नाही बाबा. आधीच मोबाईलने, इंटरनेटने पुस्तकांवर संक्रांत आणलीये. त्यात कोरोनाची भर. गावात पुस्तकांची फारशी दुकानं नाहीत, जी आहेत ती पुस्तकं विकण्यापेक्षा ऑडिओ व्हिडीओ कंटेंट विकण्यात गर्क! नावापुरती म्हणायला थोडीफार वाचनालयं आहेत; पण त्यांची कळा गेलेली, अशाने वाचनाविषयी मळमळच वाटायची लोकांना. वाचन चळवळ थोडीच वाढणार आहे? वाचनाविषयी खरी तळमळ असेल तर पुस्तकांची दुकानं आणि वाचनालयं वाढवा, सुधारा म्हणावं. तरच आम्ही लोक उत्साहाने वाचनाकडे वळू.

Back to top button