‘पुष्पा 2’ मधून सामंथा आऊट? सलमान खानच्या हिरोईनला संधी

Samantha
Samantha
Published on
Updated on

अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा' हा केवळ दक्षिणेत नव्हे, तर संपूर्ण देशात सुपरहिट ठरला. या चित्रपटात दक्षिणात्य अभिनेत्री सामंथाने आयटम साँग केले होत. तिच्या या डान्सवर आजही लोक थिरकताना दिसतात. लवकरच आता 'पुष्पा 2' येणार आहे. या सेकंड पार्टमध्येही सामंथा आपला जलवा दाखवेल, असा वाटत होते. मात्र, सध्या तरी ते अवघड दिसत आहे.

कोईमोईच्या रिपोर्टनुसार 'पुष्पा 2' मध्ये सामंथाला रिप्लेस करण्याची तयारी झाली आहे. दुसर्‍या भागातील सिजलिंग साँगसाठी सलमान खानच्या हीरॉईनला कास्ट केले जाऊ शकते. या हीरॉईनचे नाव आहे 'दिशा पटानी'. तिच्यासोबतच अनेक अभिनेत्रींची नावे शर्यतीत आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतचे ठरणार आहे. दरम्यान, 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुनने केलेला दमदार अभिनयसुद्धा चित्रपटाला यश मिळवून देण्यात यशस्वी ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news