

पुढारी ऑनलाईन :
बॉलीवूड अभिनेता सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आज मिळाले. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम खान सकाळी फिरायला जातात त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षा कर्मचार्यांना एका विहाराच्या ठिकाणी धमकीचे पत्र सापडले. सलमान आणि सलीम खान या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आल्या होत्या. पंजाब मधील गायक सिद्धू मूसेवालासारखीच तुझी अवस्था करु अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती तात्काळ वांद्रे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. गायक सिद्धू मूसेवाला याची 29 मे रोजी अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर सलमान खानला धमकी .िमिळाल्याने बाॅलीवूडमधीये खळबळ माजली आहे.