Pooja Hegde : ‘नय्यो लगदा’ मध्ये लडाखच्या वाळवंटात सलमान-पूजाचा रोमान्स

Pooja Hegde
Pooja Hegde
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या टिझरने चाहत्याच्या मनात घर केलं आहे. याच दरम्यान व्हेलेंटाईन डेच्या निमित्ताने सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील पहिल्या गाण्याची झलक पाहायला मिळाली आहे. या गाण्यात खास करून सलमान खान अभिनेत्री पूजा हेगेडेसोबत ( Pooja Hegde ) रोमान्स करताना दिसणार आहे.

सलमान खानने नुकतेच त्याच्या इंन्स्टाग्रामवर आगामी 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याचे बोल 'नय्यो लगदा' असे आहेत. मात्र, हे संपूर्ण गाणे उद्या म्हणजे, १२ फेब्रुवारीला चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात खास करून सलमान आणि पूजाचा ( Pooja Hegde ) रोमान्स पाहायला मिळणार आहेत. 'नय्यो लगदा' गाण्याच्या या टीझरवरून हे एक रोमँटिक गाणे असणार असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.

या गाण्याचे शूट लडाखच्या वाळवंटात करण्यात आले आहे. 'नय्यो लगदा' हे गाणे हिमेश रेशमियाने संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे बोल शब्बीर अहमद आणि कमाल खान यांनी लिहिले असून पलक मुच्छाल यांनी आवाज दिला आहे.

या चित्रपटात सलमान खानसोबत वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंह, अभिमन्यु सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २०२३ रोजी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news