

निवडणूक आयोगाने कर्मचार्यांवर कामाच्या जबाबदार्या दिल्या आहेत. त्यात महिला कर्मचार्यांचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीचा पारा चढलेला असतानाच एका निवडणूक अधिकार्याचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. सौंदर्याची खाणच असलेल्या या निवडणूक अधिकार्याच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया देत या अधिकारी महिलेच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका महिला कर्मचार्याला निवडणुकीची ड्युटी लावली होती. ईशा अरोरा असे या महिलेचे नाव आहे. गंगोह विधानसभा क्षेत्रातील महंगी गावात त्या ड्युटीवर होत्या. महिलांना निवडणुकीचे काम करताना अडचणी येतात का, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर ईशा यांनी तत्काळ उत्तर दिले. निवडणूक आयोगाने चांगली व्यवस्था केली आहे. आम्हाला कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागत नाही आहे. ईशा स्टेट बँकेत कार्यरत आहेत.