SAFF Championship : ‘भारतच बादशाह!’; कुवेतला नमवत सॅफ चॅम्पियनशिपचे नवव्यांदा विजेतेपद पटकावले

SAFF Championship : ‘भारतच बादशाह!’; कुवेतला नमवत सॅफ चॅम्पियनशिपचे नवव्यांदा विजेतेपद पटकावले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेंगळुरू येथे झालेल्या सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने कुवेतचा पेनल्टीवर ४-५ अशा फरताने पराभल करत  नवव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (SAFF Championship)

सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघानी आक्रमक खेळीचा अवलंब केला.  सामन्याच्या १४ व्या मिनिटाला भारतीय संघाच्या बचावफळीला भेदत कुवेतच्या शबिब अल खालिदने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कमी करण्यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंनी जलद आक्रमने केली. परंतु, कुवेतच्या बचावपटूंनी केलेल्या कामगिरीमुळे भारताला गोल करता आला नाही. (SAFF Championship)

सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला भारताच्या ललिनझुला छंगटेने गोल नोंदवत संघाला पुन्हा सामन्यात आणले. यानंतर दोन्ही संघानी अनेक चढाया रचत गोल करण्याचे प्रयत्न केले, परंतु दोन्ही संघाच्या बचावपटूंनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे संपुर्ण वेळेत दुसरा गोल करता आला नाही. निर्धारित ९० मिनिटात स्कोर १-१  असा बरोबरीत असल्यामुळे सामना एस्ट्रा टाईममध्ये खेळवण्यात आला.

यामध्ये दोन्ही संघानी आघाडी भक्कम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना फिनिशिंग अभावी गोल नोंदवता आला नाही. यामुळे सामन्याच्या निकाल पेनल्टी शुट आऊटमध्ये लावण्याचा निर्णय रेफ्रींनी घेतला. यामध्ये भारताने कुवेतचा ४-५ अशा फरकाने पराभव करत नवव्यांदा सॅफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news