मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIAच्या महासंचालकपदी | Sadanand Date

मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIAच्या महासंचालकपदी | Sadanand Date
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे सुपुत्र आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) महासंचाकलपदी झालेली आहे. दहशतवादी कारवायांविरोधात तपास करणारी देशपातळीवर संस्था असलेल्या NIAवर झालेली दाते यांची नियुक्ती ३१ डिसेंबर २०२६पर्यंत असणार आहे. सध्याचे NIAचे महासंचालक दिनकर गुप्ता ३१ मार्चला निवृत्त होत आहेत.

दाते १९९०च्या बॅचचे महाराष्ट्र केडरमधील आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कुशल अधिकारी अशी दाते यांची ओळख आहे. दाते सध्या महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. यापूर्वी त्यांनी मिरा भायंदर, वसई, विरार आयुक्तालयाचे आयुक्त, मुंबईच्या क्राईम ब्रांचचे सहआयुक्त अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांनी धडाडीची कामगिरी बजावली होती. कामा हॉस्पिटल येथे दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या महिला आणि मुलांची सुटका दाते यांच्यामुळे होऊ शकली होती, याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले होते. दाते यांची ओळख अत्यंत चिकाटीचे अधिकारी अशी आहे. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत काम करत असताना ते सकाळी ८.३० ते रात्री ९.३०पर्यंत कार्यालयात असायचे. मिरा भायंदर, वसई-विरार हे आयुक्तालय पूर्ण उभे करण्याची जबाबदारी त्यांनी एक हाती सांभाळली होती.
दाते यांनी पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट केली आहे आणि ते मुळचे पुण्याचे आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news