Sachet Loans : ‘सॅचेट लोन’ काय आहे? गुगलकडून भारतात दिले जाणार कर्ज

Sachet Loans
Sachet Loans
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली प्रगती मैदानावर गुरुवारी (दि.१९) 'Google for India 2023' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात Google India ने देशातील किरकोळ कर्ज व्यवसायात उतरण्याची इच्छा उघड केली आहे. गुगल इंडियाने ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठी क्रेडित केंद्रित उत्पादनांची श्रेणी जाहिर केली. यामध्ये भारतातील सॅचेट लोनचा समावेश आहे. हे लोन देशातील लहान व्यवसायांना मदत करण्यासाठी Google Pay अॅपद्वारे प्रदान केले जाईल. (Sachet Loans)

सॅचेट लोन काय आहे? (Sachet Loans)

सॅचेट लोन ही लहान आकाराची वैयक्तिक कर्जे असतात. सामान्यतः कमी परतफेडीच्या कालावधीसह दिली जातात. ET अहवालानुसार, Google ने ePayLater सोबत भागीदारीत व्यापार्‍यांसाठी क्रेडिट लाइन देखील सक्षम केली आहे. ज्याचा उद्देश व्यापार्‍यांच्या भांडवली गरजांभोवतीची आव्हाने सोडवणे आहे. Google Pay दिल्ली-आधारित NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी) DMI फायनान्सच्या भागीदारीत सॅचेट लोन ऑफर करत आहे. ज्याची किंमत रु. 15000 पासून सुरू होते आणि EMI 111 रुपयांपर्यंत कमी आहे. (Sachet Loans)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news