छोट्याशा गुलाबराव पाटलांच्या विरोधात उभे राहणे शोभणार नाही; ठाकरे गटाच्या शरद कोळींचा टोला | पुढारी

छोट्याशा गुलाबराव पाटलांच्या विरोधात उभे राहणे शोभणार नाही; ठाकरे गटाच्या शरद कोळींचा टोला

जळगाव, पुढील वृत्तसेवा : छोट्याशा गुलाबराव पाटलांविरोधात निवडणूक लढवणे शोभणार नाही, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला आहे. गुलाबराव पाटलांना धास्ती होती म्हणूनच माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, मी आता एवढ्या मोठ्या पदावर आहे. छोट्याशा गुलाबराव पाटलांच्या विरोधात उभे राहणे शोभणार नाही, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केले आहे. गेल्या अकरा दिवसापासून कोळी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भेट दिल्यानंतर शरद कोळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद कोळी म्हणाले,  यापूर्वी मी जळगावत आलो असता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता. मी दुसऱ्यांदा शिवसेनेचा उपनेता झाल्यावर माझी सुरुवात जळगावतूनच होत आहे. त्यावेळेस मी जळगाव ग्रामीण मधून लढण्याची घोषणा केली त्यावेळेस गुलाबराव पाटलांनी याची धास्ती होती. त्यामुळेच माझ्यावर  गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचलंत का?

Back to top button