

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध टीव्ही स्टार अनास्तासिया कचार्वे (Anastasia Kochervey) हिच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अनास्तासियाचा मृतदेह सापडला आहे. 28 वर्षीय अनास्तासिया कचार्वे या महिन्याच्या सुरुवातीला बेपत्ता झाली होती. ती ना कुठल्या कॉलला उत्तर देत होती ना कुठल्या मेसेजला. द सनच्या वृत्तानुसार, 13 ऑगस्ट रोजी अनास्तासिया कचार्वेचा मृतदेह सेंट पीटर्सबर्गमधील एका नदीत सापड. बुधवारी हा मृतदेह अनास्तासिया कचार्वेचा असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
अनास्तासिया कचार्वेच्या (Anastasia Kochervey) मृत्यूचा तपास सुरू करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा हत्येच्या दृष्टीकोणातून तपास करत आहेत. अनास्तासिया रिअॅलिटी डेटिंग शो 'डोम 2' मध्ये दिसली होती. हा शो पहिल्यांदा 2004 मध्ये प्रसारित झाला आणि तो रशियन टीव्ही इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारा रिअॅलिटी शो बनला. 'लेट्स गेट मॅरीड' या मालिकेतही तिने काम केले होते.
अनास्तासिया कचार्वेबद्दल (Anastasia Kochervey) तिच्या मित्रांना अनेक प्रकारची माहिती दिली आहे. तिच्या एका मैत्रिणीने सांगितले की तिला काही दिवसांपासून त्रास होत होता आणि एक माणूस तिला धमकावत होता. काही दिवसांपूर्वी अनास्तासियाने तिचे घर विकले आणि ती सेंट पीटर्सबर्ग येथे शिफ्ट झाली होती.