Russia Ukraine War : रशियाच्या दोन गस्ती नौका केल्या उद्ध्वस्त

Russia Ukraine War : रशियाच्या दोन गस्ती नौका केल्या उद्ध्वस्त
Published on
Updated on

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) युक्रेनने काळ्या समुद्रातील रशियाच्या दोन नौका उद्ध्वस्त केल्या. युक्रेनच्या ड्रोनने रशियाच्या या रॅप्टर क्लास बोटींवरील निशाणा साधला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे विश्वासू आर्मी चीफ जनरल वालेरी गेरासिमोव या हल्ल्यात जखमी झाल्याचे वृत्त आहे. पुतीन यांनी त्यांना युद्धात लवकरात लवकर यश मिळविण्याच्या उद्देशाने खार्किव्ह आघाडीवर तैनात केले होते.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सल्लागार एरेस्टोविच यांनी खार्किव्ह येथे रशियन मेजर जनरल आंद्रेई सिमोनोव्ह यांचाही मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. रशियाच्या एकूण 9 टॉप कमांडरचा युक्रेनमध्ये आतापर्यंत मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रशियाचे आतापर्यंत 24 हजार सैनिक युद्धात मृत्युमुखी पडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनने धरणाचे दरवाजे उघडले (Russia Ukraine War)

रशियन रणगाडे कीव्हमध्ये घुसू नयेत म्हणून युक्रेनने एका धरणाचे दरवाजे खुले केले. त्या पाण्यामुळे सीमेवरील भागात दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे रशियन रणगाडे येथे घुसू शकले नाहीत शिवाय युक्रेनच्या सैन्याला तयारीचा वेळही मिळाला. (Russia Ukraine War)

विशेष म्हणजे, धरणाचे दरवाजे उघडल्याने येथील डेमिडिव्ह गावात पूर येऊन निम्म्याहून अधिक गाव पाण्याखाली गेले आहे. पण, तरीही गावकर्‍यांनी देशभक्तीचे प्रदर्शन करत आनंद व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन या आठवड्यात युरोपमधील रोमानिया आणि स्लोव्हाकिया या देशांचा दौरा करणार आहेत. तेथे स्थलांतरित झालेल्या युक्रेनी कुटुंबीयांचीही त्या भेट घेणार आहेत.

* 9 मे म्हणजेच रशियाच्या विजय दिनापूर्वी युद्ध थांबणार नाही, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी म्हटले आहे. दहा लाख युक्रेनी नागरिक त्यांच्या मर्जीने रशियात विस्थापित झाल्याचेही त्यांनी सांगितले.

* युक्रेनच्या 800 स्थानांवर हल्ला केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

* युद्धामुळे रशियात गॅसोलिनचा तुटवडा भासू लागली आहे. त्यामुळे गॅस स्टेशन्सबाहेर लांबच्या लांब रांगा दिसत आहेत.

* खेरसॉन प्रांतात रशियाने अनेक बदल केले असून येथे युक्रेनी चलन हद्दपार करून त्याऐवजी रूबलद्वारे व्यवहार करण्याचे धोरण रशियाने अवलंबले आहे.

* डोनेट्स्क येथे रशियाच्या गोळीबारात 4 नागरिकांचा मृत्यू तर 11 जण जखमी झाले. खार्किव्ह येथे 3 मृत्यू तर 8 जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news