

मॉस्को / कीव्ह; वृत्तसंस्था : काळ्या समुद्रात युद्धनौका बुडाल्यानंतर रशियाने (russia ukraine war) अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याचे थांबवावे; अन्यथा अमेरिकेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे. दरम्यान, युक्रेनला अमेरिकेचा कायमच पाठिंबा राहणार असून आम्हाला युक्रेनला मदत करण्यापासून कोणीच रोखू शकत नसल्याचे प्रत्युत्तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिले आहे. दरम्यान रशियाने युक्रेन लष्कराची फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे. त्याला रशियन संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील (russia ukraine war) युद्ध सलग 52 व्या दिवशीही सुरूच आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अतोनात नुकसान झाले असून, शेकडो नागरिकांना आतापर्यंत आपले प्राण गमावावे लागले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार राजधानी कीव्हमधून आतापर्यंत 900 पेक्षा अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. यातील 350 मृतदेह बूचा येथून मिळाले आहेत. तसेच अडीच ते तीन हजार युक्रेनी सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असून 10 हजारपेक्षा अधिक सैनिक जखमी झाले आहेत.
युद्ध अपडेटस् (russia ukraine war)