rupali patil : रूपाली पाटील यांचा मनसेचा राजीनामा

rupali patil : रूपाली पाटील यांचा मनसेचा राजीनामा
Published on
Updated on

पुणे; वृत्तसंस्था : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( Maharashtra Navnirman Sena ) माजी नगरसेविका रूपाली पाटील ( rupali patil ) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( raj thackeray ) बुधवारपासून तीन दिवस आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पुण्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असताना हा राजीनामा आल्याने पक्षात खळबळ उडाली.

मनसेच्या स्थापनेपासून रूपाली पाटील ( rupali patil ) पक्षात कार्यरत होत्या. 2012 मध्ये पक्षाचे 29 नगरसेवक निवडून आले, त्यावेळी पाटील या भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडून आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. अत्यंत लढाऊ बाण्याने मनसेच्या विविध आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता.

 रूपाली  पाटील ( rupali patil ) आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( Nationalist Congress Party ) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी पाटील यांचे पत्र मिळाल्याचे सांगत त्याला दुजोरा दिला. त्यात राजीनाम्याचा स्पष्टपणे उल्लेख नसला, तरी तुमच्या सहकार्याबद्दल आभार असा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news