

न्यूयॉर्क : कधी कधी काही व्यक्तींकडे पाहिले की, आपले वेगळेच समज होऊ शकतात. आता या फोटोंमध्ये दिसणारी महिला ही शास्त्रज्ञ आहे, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. हे खरं आहे की, ही महिला एक शास्त्रज्ञ आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही महिला इतकी सुंदर आहे की, तिला पाहून तुम्हाला वाटेल की, ही एक हॉलीवूड अभिनेत्री किंवा मॉडेल आहे. या महिलेचं नाव रोझी मूर असं असून, ती एक प्राणिशास्त्रज्ञ आहे; परंतु ती मॉडेलिंगदेखील करते.
रोझी मूर सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. तिची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, तिने सोशल मीडियावर एखादा फोटो शेअर केल्यानंतर लगेच व्हायरल होऊ लागतो. रोझीचं सौंदर्य पाहून अनेक लोक घायाळ होतात; परंतु ती तिच्या सौंदर्यास बुद्धिमत्ता, संशोधन व वन्यजीवांबाबत असलेल्या प्रेमाची किनारदेखील आहे.
रोझीच्या प्रत्येक फोटोवर 'ब्युटी विथ ब्रेन' ही कमेंट हमखास पाहायला मिळते. रोझी एक प्राणिशास्त्रज्ञ आहे आणि तिचं काम सांभाळून मॉडेलिंग करते. ती धोकादायक प्राण्यांना हाताळण्याचे काम करते. रोझी आता 26 वर्षांची आहे. ती तिचे बिकिनी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रोझीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटस्चा पाऊस पडतो.