Rohit Sharma : रोहित शर्माचे T20 मध्ये अनोखे ‘त्रिशतक’, विराटला टाकले मागे

Rohit Sharma : रोहित शर्माचे T20 मध्ये अनोखे ‘त्रिशतक’, विराटला टाकले मागे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठी कामगिरी केली आहे. हिटमॅनने आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले आहेत आणि ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने ही कामगिरी केली आहे. भारतीय कर्णधाराने शनिवारी एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात हा टप्पा गाठला. त्याने आपल्या डावात दुसरा चौकार मारताच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले. या खेळीत त्याने 20 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार आणि दोन षटकार लगावत 31 धावा केल्या.

योगायोगाने माजी कर्णधार विराट कोहलीही याच विक्रमाचा पाठलाग करत होता. मात्र या सामन्यात त्याला केवळ एक धाव करता आली आणि हा विक्रम कायम राखण्यात तो हुकला. यावेळी कोहलीच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 298 चौकार आहेत. कोहली पहिल्या सामन्याचा भाग नव्हता. पण तब्बल पाच महिन्यांनंतर तो टी-20 संघात परतला. विराट कोहलीसाठी या सामन्यात धावा करणे अत्यंत महत्त्वाचे होते कारण तो बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करत होता आणि त्याला आपले स्थान टिकवण्यासाठी मोठी धावसंख्या करणे आवश्यक होते. कोहली आणि रोहित दोघांनाही रिचर्ड ग्लीसनने बाद केले, वयाच्या 34 व्या वर्षी पदार्पण केले. (rohit sharma beats virat kohli in race to achieve unique milestone during 2nd t20i vs england)

भारताने इंग्लंडविरुद्धची सलग चौथी टी-20 मालिका जिंकली

भारताने दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा सलग चौथा T20I मालिका विजय आहे. एजबॅस्टन येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गडी गमावून 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 17 षटकांत 121 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 35 आणि डेव्हिड विलीने नाबाद 33 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने तीन तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. (rohit sharma beats virat kohli in race to achieve unique milestone during 2nd t20i vs england)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news